Viral Video : धाडसी महिलेने सिंहाला मांजराप्रमाणे हातात पकडून नेले, व्हायरल व्हिडीओने खळबळ

| Updated on: Jun 23, 2023 | 8:05 PM

आपण या व्हिडीओत एका महिलेला तिच्या वजनाच्या इतक्या सिंहाला मांजरा प्रमाने बखोट्याला धरून नेताना पाहून समाजमाध्यमावर या व्हिडीओने खळबळ उडाली आहे.

Viral Video :  धाडसी महिलेने सिंहाला मांजराप्रमाणे हातात पकडून नेले, व्हायरल व्हिडीओने खळबळ
lion lady
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : आपण कुत्र्याला किंवा मांजरांना फिरायला नेताना तसेच त्यांच्यासोबत खेळताना लोकांना पाहिले असेल. तुम्ही कुत्रा किंवा मांजरा सारख्या प्राण्यांना बखोटे पकडून नेत असलेल्या मालकांना पाहिले असेल. परंतू सोशल मिडीयात ( Social Media ) एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात एक महिला चक्क जंगलाच्या राजा सिंहाला ( Lion ) कुठल्या महिलेने अशा प्रकारे बखोटे धरुन नेत असताना सहसा कोणाला पाहिल्याचे आठवत नसेल. या व्हिडीओत एक महिला एका सिंहाला पाळीव मांजर असल्या प्रमाणे उचलून नेताना दिसत आहे. इंटरनेटवर ( Internet Viral ) या व्हिडीओला खूप पाहिले जात आहे.

आपण या व्हिडीओत एक सडपातळ महिला तिच्या शरीराच्या वजना इतक्या असलेल्या सिंहाला उचलून वेगाने जाताना दिसत आहे. सिंहाचे वजन जास्त असल्याने तिला हा सिंहाचा बछडा पेलत नसल्याचे दमलेली दिसत आहे. आणि सिंहाचा छावा हट्ट करीत हात झाडत तिच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. सिंह तिच्याशी झटापट करताना गुरगुरत देखील आहे.  या व्हिडीओने सोशल मिडीयावर खळबळ उडाली आहे.

हा पाहा धक्कादायक व्हिडीओ…

या व्हिडीओत एक काळे कपडे परिधान केलेली महिलेला तिच्या पाळीव सिंहाला उचलून नेताना आपण पाहू शकता. हा सिंहाचा छावा घरातून पळून शहरातील गल्ली बोळात फिरताना दिसत आहे. 22 जून रोजी सोशल मिडीयावर शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत चार दशलक्ष व्ह्यूज मिळालेले आहेत. या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यातील काही कमेंट मजेशीर आहेत. एका युजरने म्हटलेय की हा नकली सिंह आहे का? तो आक्रमण करायच्या ऐवजी केवळ पंजे हलवत आहे. अन्य एका युजरने म्हटले आहे की हा मी आहे, ज्याला कारमधून नेले जात आहे.