Video : काळजाचं पाणी करणारा व्हीडिओ, उंचीवरून हॉट बलून कोसळलं, 24 सेकंदाचा व्हीडिओ पाहा…

| Updated on: Apr 12, 2022 | 8:43 PM

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरूण एका हॉट बलूनमध्ये बसलेला असतो. तो व्हीडिओ शूट करतोय. इतक्यातच हा बलून हलायला लागतो. तो हॉट एअर बलून खाली पडतो. या तरूणाच्या फोनमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे.

Video : काळजाचं पाणी करणारा व्हीडिओ, उंचीवरून हॉट बलून कोसळलं, 24 सेकंदाचा व्हीडिओ पाहा...
उंचीवरून हॉट बलून कोसळलं
Follow us on

मुंबई : सध्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. कधी कुणाच्या कौतुकाचा तर कधी धडकी भरवणारा व्हीडिओ समोर येतो आणि दिवसभर अश्या व्हीडिओंची सोशल मीडियावर चर्चा होते. असाच एक व्हीडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हीडिओ पाहून काळजाचा ठोका चुकतो. एक तरूण एका हॉट बलूनमध्ये बसलेला असतो. तो व्हीडिओ शूट करतोय. इतक्यातच हा बलून हलायला लागतो. तो हॉट एअर बलून (Hot Balloon) खाली पडतो. या तरूणाच्या फोनमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे. हा 24 सेकंदाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरूण एका हॉट बलूनमध्ये बसलेला असतो. तो व्हीडिओ शूट करतोय. इतक्यातच हा बलून हलायला लागतो. तो हॉट एअर बलून खाली पडतो. या तरूणाच्या फोनमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे. ही घटना कॅलिफॉर्नियामध्ये घडलीय आहे. निकोलस मॅक्कॉल नावाचा व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा हॉट एअर बलूनचा आनंद घेण्यासाठी गेला होता. पण वाऱ्याचा वेग जास्त होता. त्यामुळे हा हॉट एअर बलून जमिनीवर आदळला. या अपघाताची घटना घडली तेव्हा स्वतः मॅकॉलचा मोबाईल कॅमेरा सुरूच होता. ही सगळी घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हीडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हीडीओ मॅकॉलने शेअर आहे. “हॉट एअर बलूनमधून प्रवास करण्याचा माझा पहिला अनुभव…हा खेळ खराब होईपर्यंत मजेशीर असणार होता”, असं मॅकॉलने या व्हीडिओला कॅप्शन दिलं आहे. हा 24 सेकंदाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

Viral Video : स्वच्छ आकाश… निळशार पाणी, लडाखच्या पॅंगाँग तलावात तीन तरूणांचे ‘तीर’, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

खाकी स्टुडिओमध्ये रंगले इजिप्तचे सुर! ‘या मुस्तफा’ गाण्याचं मुंबई पोलीस बँडच्या वतीने सादरीकरण

Video : आता तर हद्दच झाली! नूडल्सची हेअरस्टाईल, हटके केस खाण्यासाठी दोन मुलींची घाई, व्हीडिओ एकदा बघाच…