मुलीने वडिलांशीच केले लग्न! लोकांनी म्हटलं लाज वाटत नाही? मुलीने जे उत्तर दिलं ते ऐकून सगळेच शॉक

| Updated on: Dec 04, 2024 | 1:20 PM

एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलीने तिच्या वडिलांशी लग्न केल्याचं धक्कादायक चित्र दिसत आहे. या व्हिडिओवरून प्रचंड वाद निर्माण झाला आहे. लोकांनी त्यांना ट्रोल केले, वडिलांशी लग्न का केलं? या प्रश्नावर मुलीने आणि वडिलांनी जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

मुलीने वडिलांशीच केले लग्न! लोकांनी म्हटलं लाज वाटत नाही? मुलीने जे उत्तर दिलं ते ऐकून सगळेच शॉक
Follow us on

सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल आणि त्या व्हायरल व्हिडीओमध्ये काय पाहायला मिळेल काही सांगता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ राहून सगळेच शॉक झालेत. कारण एका मुलीने वडिलांशीच लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुलीने केलं वडिलांशीच लग्न

व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. या व्हिडीओवर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेक लोकांनी व्हिडिओवर नकारात्मक कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये ती मुलगी स्वत:च हे सांगताना दिसत आहे की ,तिच्यासोबत असलेला माणूस तिचे वडिल आहेत आणि तिने त्याच्याशी मंदिरात लग्न केले आहे. तरुणीचे वय 24 वर्ष असल्याचे सांगण्यात येत असून व्हिडिओमध्ये ती ‘हे माझे वडील आहेत आणि आम्ही लग्न करून खूप आनंदी आहोत’ असे म्हणताना दिसत आहेत. त्यांच्या शेजारी उभे असलेले ‘वडील’ तिच्याशी सहमत होत म्हणतात, ‘हो, ही माझीच मुलगी आहे. मग यात काय अडचण आहे?’

मुलीचे आणि तिच्या वडिलांचे हे वक्तव्य ऐकून तिथे उपस्थित असलेल्यांना अजूनच धक्का बसतो. जेव्हा ते तिला असं करण्याचे कारण विचारतात तेव्हा ती जे उत्तर देते ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. यादरम्यान एका व्यक्तीने तिला विचारले की त्यांना एकमेकांशी लग्न करताना लाज वाटत नाही का? यावर तिथे उभे असलेले तिचे वडील ‘तुम्ही कोणत्या युगात राहता?’ आम्हाला लाज का वाटेल?’असं उत्तर दिलं, मुलीने हे देखील हेच उत्तर दिलं. तिने हा व्हिडिओ का बनवला आणि त्याचा खरा उद्देश काय आहे? असं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्या मुलीने सांगितले की, “आमचे लग्न हे त्या लोकांना उत्तर आहे जे आमच्याबद्दल वाईट बोलत होते.”

मुलीचे उत्तर ऐकून सगळेच शॉक

नवरा-बायको सारखे जगण्याच्या प्रश्नावर मुलगी म्हणते की, “साडीपासून सिंदूरपर्यंत सगळं लावूनही तुला समजत नाही का? निरुपयोगी प्रश्न का विचारता? . मी माझ्या वडिलांवर प्रेम करते म्हणून लग्न केलं.” असं म्हणत तिने उरस्थितांना उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र याच व्हिडीओची चर्चा आहे. अजून लोकांना हा प्रकार पचनी पडत नाहीये. सर्वजन या प्रकाराला चुकीचे आहे अस सांगून ट्रोल करत आहेत.

मात्र, ही मुलगी कोण, तिचे वडील कोण, ती कुठली? या सर्वाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. व्हिडिओ जवळजवळ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)