नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : कार डीझाईन एक वेगळेच क्षेत्र आहे. कार डीझाईनमध्ये दिलीप छाब्रिया यांचा कोणी हात धरु शकत नाही असे म्हटले जात होते. आता दिल्ली एनसीआरमधील एका तरुण डीझायनरने आता एका टाईप 2 मारुती 800 कारला असे काही मॉडीफाय केले आहे की तिला पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या गाडीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
मारुती कंपनीने जेव्हा भारतात प्रवेश केला तेव्हा मध्यवर्गीयांसाठी ही छोटेखाणी मारुती 800 बाजारात आणली होती. या कारला पार्क करण्यासाठी जास्त जागाही लागत नव्हती. आता मारुती 800 बाजारात फारसी कोणाकडे दिसत नाही. सध्या याच मारुती 800 कारचे मॉडीफिकेशन केल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
दिल्ली एनसीआर फरीदाबाद येथे ही मॉडीफाय केलेली मारुती 800 कार पाहायला मिळाली आहे. या कारचा संपूर्ण लूक बदलेला आहे. तिचे रुफ टॉप हटविले आहे. एका इंस्टाग्राम युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सिल्वर 800 कारचे छत हटविल्याचे दिसत आहे. तिचे ओपन रुफ कारमध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. या कारच्या रुफ सह बी पिलर आणि डी पिलर हटविले आहेत. या कारला एलॉय व्हील देण्यात आले आहेत. ही मॉडीफाय कार कॅमेऱ्यावर एकदम स्टायलीश दिसत आहे. फरीबाद के इंजिनिअर आणि दोन इमोजी अशी या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आली आहे.
हा पाहा व्हिडीओ –
आपण या व्हिडीओत ओपन टॉप मारुती सुझुकी 800 पाहू शकतो. ती पाहाताच डोके चक्रावून जाते. जरी भारतात एखाद्या कारचे संपूर्ण छप्पर हटविण्यास कायद्याने बंदी आहे. कारच्या मूळ ढाच्यात बदल करण्यास मोटर वाहन कायद्यानूसार बंदी आहे. कारचे संपूर्ण छप्पर हटविल्याने कारच्या मूळ स्ट्रक्चरला धोका निर्माण होतो. यामुळे अशा प्रकारच्या अनधिकृत मोडीफाय कारमुळे प्रवासी आणि इतर वाहनांसाठी धोकादायक आहे.