मुंबई : भारताचे चंद्रयान-3 चंद्राच्या ( Chandrayaan Mission ) दिशेने निघाल्याने जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांचे ( Isro ) त्यावर लक्ष आहे. भारताच्या या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष असतानाच आता एक चमत्कार घडला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार केवळ आंध्रातील श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ संशोधन केंद्राच्या प्रांगणातील जनता नव्हे तर जगभरातील जिथे कुठे भारतीय रहात असतील त्यांची छाती अभिमानाने फुगली. मात्र एका अवलियाने तर चमत्कारच केला आहे. त्याने या ऐतिहासिक क्षणाला अशा पद्धतीने चित्रबद्ध केले ही तोच भाग्यवान ठरला.
काल भारताचे चंद्रयान-3 अवकाशात झेपावले. त्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. चंद्रयान-2 मध्ये आलेल्या अपयशाने हार न मानता भारतीय तंत्रज्ञानी पुन्हा नव्याने अवकाशात झेप घेतली आहे. चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग केली तर भारत अमेरिका, सोव्हीएट रशिया आणि चीन या देशांनंतर चौथा देश ठरणार आहे. या क्षणाचे सर्व भारतीय साक्षीदार ठरले. परंतू एकाने तर त्यावरही कडी केली आहे. त्याला अनोख्या पद्धतीने साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. तो प्रवासी चेन्नई ते ढाका इंडीगो फ्लाई़टने जात होता.
हा पाहा व्हिडीओ…
When #aviation meets ?#astronomy!
A passenger aboard @IndiGo6E ‘s #Chennai– #Dhaka flight has captured this beautiful liftoff of #Chandrayaan3 ? ?
Video credits to the respective owner.@ISROSpaceflight @SpaceIntel101 @Vinamralongani @elonmusk @ChennaiRains #ISRO pic.twitter.com/YJKQFeBh9b
— The Chennai Skies (@ChennaiFlights) July 14, 2023
चंद्रयान-3 काल शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता आंध्रातील सतिश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून निघाले तेव्हाच हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्याचे भाग्य चेन्नईहून उड्डाण केलेल्या इंडीगो फ्लाईट 6E च्या एका भाग्यवान प्रवाशाला लाभले. जसे या चंद्रयान-3 उड्डाणाचे काऊंड डाऊन सुरु झाले तसे फ्लाईटमध्ये पायलटने अनाऊन्समेंट करीत विमानाच्या खिडकीतून पाहायला सांगितले. तसे ढगातून पांढऱ्या रंगाची लकेर उसळत अवकाशात जाताना एका अवलिया प्रवाशाने हा क्षण अलगद आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. @ChennaiFlights या अकाऊंटने ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दीड हजार युजरने रिट्वीट केले आहे. तर 5,446 युजरने लाईक्स केले आहे.