Viral Video : बापाचं काळीज, हॉस्पिटलमध्ये नव्हती व्हीलचेअर, बापाने मुलाला थेट स्कुटरवरुन लिफ्टने नेले

| Updated on: Jun 17, 2023 | 9:10 PM

मुलाचा पायाला फ्रॅक्चर झाल्याने तो हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलाला डॉक्टरांना दाखवण्यासाठी आला होता. त्याने आधी रितसर व्हीलचेअर मागितली, परंतू हॉस्पिटल प्रशासनाने हातवर केले, मग बापाने...

Viral Video : बापाचं काळीज, हॉस्पिटलमध्ये नव्हती व्हीलचेअर, बापाने मुलाला थेट स्कुटरवरुन लिफ्टने नेले
scooty in lift
Image Credit source: socialmedia
Follow us on

कोटा : बापाचं काळीज मुलांसाठी नेहमीच पाझरतं. आपल्या मुलांसाठी खस्ता खाणारा आणि आपल्या चपला झिजवणारा बाप नेहमीच मुलांसाठी सर्वकाही कष्ट आणि संकटं आनंदानं पेलत असतो. अशाच एका बापानं त्याच्या मुलाला व्हीलचेअर वा स्ट्रेचर पुरविण्यास नकार देणाऱ्या हॉस्पिटलच्या प्रशासनापुढे हार मानली नाही. त्यानं थेट मागचा पुढचा कसलाही विचार न करता मुलाला चालता येत नसल्याने आपली स्कूटरच लिफ्टमध्ये घातली आणि डॉक्टरांची भेट घेतली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बापाचं काळीज आपल्या कच्च्या बच्च्यांसाठी कसं पाघळतं ते पाहा…

राजस्थानच्या कोटा येथील एमबीएस हॉस्पिटलमध्ये एका बापाला त्याच्या मुलासाठी व्हील चेअर मिळाली नाही. मग त्या बापाने आपल्या मुलाला स्कूटरवरुनच लिफ्टच्या मदतीने तिसऱ्या मजल्यावर उपचारासाठी नेले. मुलाचा पायाला फ्रॅक्चर झाल्याने तो हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलाला डॉक्टरांना दाखवण्यासाठी आला होता. त्याने आधी रितसर व्हीलचेअर मागितली, परंतू हॉस्पिटल प्रशासनाने हातवर केले, मग बापाने जर व्हीलचेअर मिळत नसेल तर मग लिफ्ट वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.

हा पाहा व्हिडीओ…

पेशाने वकील असलेल्या एका व्यक्तीच्या मुलाचा पाय फॅक्चर झाला होता. तो मुलाचे प्लास्टर दाखविण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी रुग्णालयात आला होता. हॉस्पिटल प्रशासनाने व्हीलचेअर देण्यासाठी असर्थता दर्शविली, त्यावर त्यांनी मग मी माझ्या मुलाला डॉक्टरांच्या वॉर्डमध्ये कसे घेऊन जाऊ अशी विचारणा केली. त्यावर कर्मचाऱ्यांनी व्हीलचेअरची जबाबदारी असलेल्या व्यक्तीला भेटण्याचा सल्ला दिला.

तिसऱ्या मजल्यावर नेली स्कूटर

वकील पित्याने व्हीलचेअरचे काम सांभाळणाऱ्या सखाराम यांच्याशी बोलणे केले, मात्र व्हीलचेअर उपलब्ध नसल्याचे त्यानेही सांगितले. मग, अखेर आपल्याला लिफ्टमधून स्कूटरसह मुलाला नेण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली. अखेर सखाराम यांनी परवानगी दिली. नंतर मग त्या बापाने स्कूटरवर मुलाला बसलेल्या स्थितीत ती लिफ्टमध्ये शिरवली आणि डॉक्टरांची भेट घेतली. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. राजस्थान सरकार आणि संबंधित रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. एवढ्या प्रशस्त हॉस्पिटलमध्ये व्हीलचेअर आणि स्ट्रेचर कसे नाही ? असा सवाल केला जात आहे.