Wild animal video : सोशल मीडियावर (Social media) अनेक प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. त्यात हत्तींचे (Elephant) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक वेळा ते असे काही करू लागतात, जे पाहून आपले चांगलेच मनोरंजन होते. या पृथ्वीवरील या महाकाय प्राण्याची गणना जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जात असली तरी हा प्राणी तितकाच मजेशीर आहे. आजकाल हत्तीचा एक मजेदार व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेत आहे, ज्यामध्ये एक हत्ती गाडीच्या चाकाशी खेळताना दिसतो. आपण सर्वजण लहानपणी सायकल किंवा बाइकच्या चाकाशी किंवा टायरशी खेळायचो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक हत्ती गाडीच्या टायरशी खेळताना दिसत आहे. गजराज खूप उत्साही दिसत आहे. हत्ती आधी ट्रकचा टायर त्याच्या सोंडेला लटकवून आणतो आणि नंतर सरळ उभा करतो. हत्ती लाथ मारून चाकाला ढकलतो आणि त्याच्याशी खेळतो.
हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्यांनी एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला 40 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच लोक या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Can you relate this to your childhood pic.twitter.com/vcpAJmdbfM
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 22, 2022
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 90च्या दशकातील मुले स्वत:शी रिलेट करत आहेत. एका यूझरने तर स्वत:ला गोलू-मोलू हत्तीसारखे संबोधले, तर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये म्हटले, की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना त्यांचे बालपण आठवले.
Yes we played with cycle tyres a lot.
— Mohammad Arif Ismail (@md_arif123) February 22, 2022
Damn good and cute vdo,but being born in 2005 I hadn’t experienced it?♂️???
— Unanimously Anonymous (@CodenameBanjara) February 22, 2022
Yesss. Cycle tyre with stick. Have had races with friends. Nostalgic !
Missing those days. ?
— Komala (@Komala65335450) February 24, 2022