मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. काही व्हिडीओ इतके फनी असतात की हसू ते पाहिल्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही. अशाच प्रकारे सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. साप म्हटलं की अंगावर काटाच येतो कारण साप पाहिल्यावर भल्या-भल्यांना घाबरताना पाहिलं आहे. कारण तो साप विषारी आहे की बिनविषारी हे काही समजत नाही. मात्र साप दिसताच जी भाती वाटते त्याबद्दल विशेष काही सांगायला नको. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिलेला सापाने चप्पल मारल्यावर पाहा काय घडलं.
व्हिडीओमध्ये, एक साप घराच्या दिशेने जात होता, त्यावेळी तिथे काही महिलासुद्धा उपस्थित होत्या. सापाला समोरून येताना पाहून महिलांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली. मात्र साप त्यांच्याच दिशेने येत असल्याचं दिसताच त्यातील एका महिलेने सापाला चप्पल फेकून मारली. त्यानंतर जे काही झाले ते व्हिडीओममध्ये पाहा.
महिलेने सापाला चप्पल मारल्यावर तो साप थांबला पण नंतर चप्पल घेऊन पळू लागला. सापाने तोंडात चप्पल पकडली आणि तेथून पळू लागला. व्हिडिओमध्ये महिला म्हणत आहे की, इकडे येऊ नका, पण जेव्हा साप थांबला नाही तेव्हा तिने चप्पल फेकून दिली. चप्पल सापाच्या तोंडात अडकली आणि तो चप्पल घेऊन तेथून पळून गेला.
दरम्यान, सापाचा हा व्हिडीओ व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ युजर्सनी आपल्या मित्रांना फॉरवर्ड केला आहे.