Viral Video: अनेकांना मनमुराद हुंदडायला आवडतं. त्यासाठी कोणी समुद्र किनारी तर कोणी दऱ्याखोऱ्यात जातो तर कोण थेट अभयारण्यात (Sanctuary). आपल्याकडेही असे अनेक जन आहेत ते जंगल सफारीवर जातात. वन्यजीवांच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासह वन्य प्राण्यांनाही (wildlife) जवळून पाहण्याची संधी यातून मिळते. त्यामुळे यापेक्षा चांगला पर्याय कोणताच असू शकत नाही. तर आपल्याकडे वाघ पाहिला हे सांगणारे किती खुश असतात. पण जर वाघाऐवजी तुमच्यासमोर सिंह आला तर आणि त्यावेळी गाडीच्या समोर असणाऱ्या ट्रॅकर सीटवर तुम्ही एकटेच बसला असाल तर मग काय होईल? सिंहाला (lion)अगदी जवळून पाहिल्यावर तुमची अवस्था कशी होईल हे उघड आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये एक सिंह पर्यटकांच्या वाहनांच्या अगदी जवळ पोहोचतो. व्हिडिओमध्ये ट्रॅकर सीटवर बसलेल्या रेंजरची अवस्था पाहण्यासारखी आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ काही सेकंदांचा आहे, पण त्यात दिसणारे दृश्य खरोखरच श्वास रोखून ठेवणारे आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगल सफारीदरम्यान कार एका ठिकाणी थांबते. पर्यटक आपले कॅमेरे काढून इकडून तिकडे फोटो काढतात. दरम्यान एक अशी घटना घडते ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. आपण पाहू शकता की एक सिंह ट्रॅकर सीटवर बसलेल्या रेंजरच्या अगदी जवळ येतो. यानंतर तो इतका घाबरतो की तो आपल्या जागेवरून हलतही नाही. यादरम्यान सिंहाचे डोळे पाहण्यासारखे असतात. मात्र, पुढे काय झाले हे कळत नाही कारण हा व्हिडिओ येथेच संपलेला आहे.
wildtrails.in नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जर तुम्ही ट्रॅकर सीटवर असता तर तुम्ही काय कराल? पण हा व्हिडिओ पाहून बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. एका युजरवर कमेंट करताना लिहिले की, सिंहाचे डोळे त्या व्यक्तीकडे किती रागाने बघत आहेत हे दाखवतात. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, सिंहाला भूक लागली नसेल, त्यामुळे त्याने हल्ला नाही केला. त्याचप्रमाणे, व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक युजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत.