Video : ओलाची स्कुटर बंद पडली, पठ्ठ्याने थेट गाढव गाडीला बांधलं अन् गावभर वरात काढली, चर्चा तर होणारच!

| Updated on: Apr 26, 2022 | 1:20 PM

बीडच्या परळीत एका व्यक्तीने घेतलेली नवीन इलेक्ट्रिक बाईक बंद पडली. बंद पडलेल्या नव्या बाईकची कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने बाईकच्या मालकाने ही इलेक्ट्रिक बाईक चक्क गाढवाला बांधून शहरात फिरवून अनोखं आंदोलन केलं.

Video : ओलाची स्कुटर बंद पडली, पठ्ठ्याने थेट गाढव गाडीला बांधलं अन् गावभर वरात काढली, चर्चा तर होणारच!
व्हायरल व्हीडिओ
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एका स्कुटरची, तिच्या मालकाची अन् एका गाढवाची गोष्ट व्हायरल (Viral News) होत आहे. एका व्यक्तीने ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आणि काही दिवसांनी स्कूटर बंद पडली. त्या व्यक्तीने ओला कंपनीकडे तक्रार केली असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. मग रागाच्या भरात त्या व्यक्तीने जे केलं ते भन्नाट आहे. याचीच सध्या सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्याने ओला इलेक्ट्रिक स्कूटर गाढवाला बांधली आणि नंतर ती गावरभर मिरवणूक काढली. त्याचा अनोखा निषेध लोकांच्या पसंतीला उतरला. अन् हा व्हीडिओ व्हायरल (Viral Video) झाला.

व्हायरल व्हीडिओ

एका व्यक्तीने ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आणि काही दिवसांनी स्कूटर बंद पडली. त्या व्यक्तीने ओला कंपनीकडे तक्रार केली असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. मग रागाच्या भरात त्या व्यक्तीने जे केलं ते भन्नाट आहे. याचीच सध्या सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्याने ओला इलेक्ट्रिक स्कूटर गाढवाला बांधली आणि नंतर ती गावरभर मिरवणूक काढली. त्याचा अनोखा निषेध लोकांच्या पसंतीला उतरला. अन् हा व्हीडिओ व्हायरल झाला.

बीडच्या परळीत एका व्यक्तीने घेतलेली नवीन इलेक्ट्रिक बाईक बंद पडली. बंद पडलेल्या नव्या बाईकची कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने बाईकच्या मालकाने ही इलेक्ट्रिक बाईक चक्क गाढवाला बांधून शहरात फिरवून अनोखं आंदोलन केलं. या अनोख्या आंदोलनाची गावभर चर्चा झाली.


ही घटना बीड जिल्ह्यातील आहे. बीड जिल्ह्यात एका व्यक्तीने ओला इलेक्ट्रिक स्कूटरला विरोध केला. सचिन गिते असं या व्यक्तीचं नाव आहे. पण ही स्कूटर बंद पडल्याने सचिन यांना राग आला त्यांनी गाढवाच्या पाठीमागे स्कुटर बांधत निषेध व्यक्त केला. सचिन गिते यांनी ओला इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्यानंतर सहा दिवसांनंतर स्कुटर चालायला प्रॉब्ल्म येऊ लागला. मग त्यांनी ओला कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर ओला मेकॅनिकने त्याची स्कूटर तपासली. पण ते दुरुस्त करण्यासाठी कुणीही आलं नाही. सचिन गिते यांनी कस्टमर केअरला अनेक फोन केले. मात्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी ही अशी मिरवणूक काढली.

संबंधित बातम्या

Video : बचपन का प्यार एकदम कडक!, शाळेचा युनिफार्म घालून चिमुकल्याचा भन्नाट डान्स

Video : जिराफ आणि चिमुरड्याची दोस्ती, नेटकरी म्हणतात, “जगातील सर्वात गोड व्हीडिओ”

Video : लोकांचा डान्स सोडा, छोट्या कॅमेरामनची स्टाईल बघा, फॅन होऊन जाल…