मुंबई : लग्नाचा सीजन असो वा नसो, परंतु सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ (VIRAL VIDEO) पाहायला मिळतात. कधी नवरा त्यांच्या प्रवेशामुळं अधिक व्हायरल होतो, तर कधी नवरी तिच्या प्रवेशामुळं अधिक व्हायरल होते. कधी-कधी लग्नात आलेले पैपाहुणे सुध्दा लोकांचं अधिक मनोरंजन करतात. लग्नात काहीवेळेला चांगले आणि वाईट असे दोन्ही पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे सगळं पाहून त्यांना हैराणी सुध्दा होऊ शकते आणि हसू सुध्दा येऊ शकतं. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नवरा आणि नवरीमध्ये कडाक्याचं (Bride Groom fight on stage) भांडणं सुरु आहे. व्हिडीओमध्ये दोघांच्यामध्ये चांगलचं भांडणं (Bride groom fight) झाल्याचं पाहायला मिळत आहे.
व्हिडीओतील मारपीठ असली असो किंवा नकली, हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. अशा पद्धतीने भांडणं झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. व्हिडीओत नवरा आणि नवरी एकमेकांमा मारहाण करीत आहे. हा व्हिडीओ खरा आहे की खोटा आहे, हे आम्हाला माहित नाही. परंतु हा व्हिडीओ पाहताना अधिक मजा आली आहे. नवरा आणि नवरी एकमेकांना डब्लूडब्लूई सारखी मारहाण करीत आहे.
Kalesh B/w Husband and Wife in marriage ceremony pic.twitter.com/bjypxtJzjt
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 13, 2022
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्विटरवरती हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ डिसेंबर महिन्यात शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 166.8K लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर ३ हजार पेक्षा अधिक लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. हा व्हिडीओ पाहून लोकं विविध पद्धतीच्या कमेंट करीत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करीत असताना लिहिलं आहे की, कुस्तीची मॅच अधुरी राहिली आहे.