Animals funny video : गिधाडे हे शिकारी (Hunter) पक्षी आहेत, ज्यांची दृष्टी खूप तीक्ष्ण असते. गिधाडे हे काळ्या आणि तपकिरी रंगाचे आणि उंच पक्षी आहेत, त्यांची चोच वाकडी आणि शिकारीसाठी मजबूत असते. ते सर्वकाही खाऊ शकतात. एकप्रकारे, गिधाड सफाई कामगार म्हणून काम करतात, जे मेलेले प्राणी खाऊन रोग पसरू देत नाहीत. मात्र, आता गिधाडे कमी होत चालली आहेत. तुमच्या लक्षात आले असेल तर तुम्हाला आठवत असेल की काही वर्षांपूर्वीपर्यंत गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गिधाडे दिसत होती. आता मात्र खेड्यापाड्यात गिधाडांचा मागमूसही नाही. एका अहवालानुसार, गेल्या दशकात भारत आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये गिधाडांची संख्या 90 टक्क्यांनी कमी झाली आहे. या सर्वांमध्ये गिधाडांशी संबंधित एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर (Social media) प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ अतिशय मनोरंजक आहे.
रस्त्याच्या कडेला गिधाडांचा कळप बसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. गिधाडांनी ही बैठक काही मोठ्या चर्चेसाठी बोलावल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की काही गिधाड इकडे बघत आहेत तर काही तिकडे… यानंतर सर्व गिधाडे जवळ जाऊन बसतात. गिधाडांना असे एकत्र बसलेले पाहून तुम्हालाही असे वाटेल, की जणू काही त्यांची संसद सुरू आहे किंवा एखाद्या मोठ्या विषयावर तातडीची बैठक सुरू आहे. हा मजेदार व्हिडिओ पाहा –
ज़रूर किसी गंभीर विषय पर आपात बैठक बुलाई गई है ? pic.twitter.com/75VqGYzktu
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 23, 2022
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. यासोबत त्यांनी एक मजेशीर कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, ‘कोणत्यातरी गंभीर विषयावर तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे’. हा व्हिडिओ बघितला जात आहे आणि खूप पसंतीही मिळत आहे. तातडीची बैठक झाली की लोक एकत्र जमतात हेही तुम्ही पाहिले असेल. सध्या कोणत्या मुद्द्यावर गिधाडांची तातडीची बैठक सुरू आहे, हे त्यांनाच माहीत. या व्हिडिओला आतापर्यंत 15 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.