लाखो रुपये खर्च केलेली सिग्नल व्यवस्था बंद, पोलिस म्हणतात तांत्रिक बिघाड, त्यामुळे वाहन चालक मोकाट

| Updated on: Mar 21, 2023 | 9:13 AM

चारही बाजुच्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगच्या पांढऱ्या पट्टया मारण्यात आल्या होत्या. सुरवातीला काही दिवस सिग्नल लागलेले दिसून आले. परंतु वर्ष उलटून गेले तरी अद्यापही शहरातील कोणत्याच चौकात सिग्नल व्यवस्था सुरळीत सुरु झालेली नाही.

लाखो रुपये खर्च केलेली सिग्नल व्यवस्था बंद, पोलिस म्हणतात तांत्रिक बिघाड, त्यामुळे वाहन चालक मोकाट
washim signal
Image Credit source: tv9marathi
Follow us on

वाशिम : लाखो रुपये खर्च करुन वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी शहरातील पाच चौकात सिग्नल व्यवस्था नगर पालिकेने लावली. परंतू मागील अनेक वर्षापासून सिग्नल (Singnal) व्यवस्था सुरुच झाली नाही. केवळ नावापुरतेच सिग्नल लावण्यात आले असून शहरातील प्रत्येक चौकात दररोज वाहतुकींची कोंडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नगर पालिका प्रशासन (Washim municipal administration) म्हणते की, आम्ही सिग्लन व्यवस्था सुरु करुन दिली. शहर वाहतुक शाखेकडून त्यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देत आहे. त्यामुळे लाखो रुपयाचा चुरडा झाल्याची चर्चा वाशिम शहरातील नागरीक करीत आहेत. या गंभीर समस्येकडे जिल्हाधिकारी (Washim Collector) लक्ष देणार का असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

वाशिम शहरातील पाटणी चौक हा मुख्य चौक आहे. याच चौकात मुख्य बाजारपेठ असून अनेक कपडयाची दुकाने, मेडिकल, किराणा, भाजीपाला व इतर महत्वाची दुकाणे असल्यामुळे खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरीकांसह शहरवासीयांची दररोजच गर्दी होते. यासोबतच इतरही चौकात दररोज वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे शहरात सिग्नल व्यवस्थेची मागणी होत होती. त्याअनुषंगाने शहरातील पाटणी चौक, अकोला नाका, पुसद नाका, पोलीस स्टेशन चौक आणि आंबेडकर चौकात नगर पालीकेने लाखो रुपये खर्चून सिग्नल व्यवस्था लावण्यात आली.

चारही बाजुच्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगच्या पांढऱ्या पट्टया मारण्यात आल्या होत्या. सुरवातीला काही दिवस सिग्नल लागलेले दिसून आले. परंतु वर्ष उलटून गेले तरी अद्यापही शहरातील कोणत्याच चौकात सिग्नल व्यवस्था सुरळीत सुरु झालेली नाही. बहुतांश चौकात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी काही ठराविक काळापर्यतच दिसतात. शहरातील महत्वाच्या रस्त्याच्या मधोमध रस्ता दुभाजकच बांधण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना मोकळे रान मिळते. रस्त्यावर दुभाजक नसल्यामूळे शहर वाहतुक शाखेच्यावतीने लोखंडी बॅरीकेटस लावण्यात आले आहेत. पाटणी चौकातून एक राज्य मार्ग जात असल्यामूळे जड वाहतुकीमूळे देखील वाहतुक विस्कळीत होते. व्यापाऱ्याकडे जड वाहनातून आलेल्या मालाच्या गाडया देखील रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात.

हे सुद्धा वाचा

दुकानदार दकानाबाहेरची जागा आडवून ठेवतात, त्यातच हातगाडे अशा गदारोळयात गाड्याची पार्कींग होत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो. सदर सिग्नलचे काम नागपूरच्या कंपनीकडे असून देखभाल दुरुस्तीची समस्या कोण सोडविणार हे एक कोडेच आहे. दिवसेंदिवस शहरातील वाहतुकीची समस्या कमी होण्याएैवजी जटील होत चालली आहे. यामुळे अनेकवेळा किरकोळ अपघातही होत आहेत. शहरात वाहतूक शाखेचे कर्मचारी नित्यनेमाने सेवा बजावित असले तरी बंद पडलेल्या सिग्नलमुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरुन काम करावे लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.