सोशल मीडिया (Social Media) हा काही फक्त वाईटच गोष्टी व्हायरल करतो, अशातला भाग नाही. माणूसकी अजूनही जिवंत आहे, हे सोशल मीडियानं आपल्याला वेळोवेळी दाखवूनही दिलंय. त्याचंच जिवंत उदाहरण आता पुन्हा एकदा समोर आलं आहे. एकानं ट्रेनखाली आलेल्या अल्पवयीन मुलीचा जीव स्वतःच्या जीवाची बाजी लावत वाचवला आहे. एक मालगाडी लहान मुलीच्या अंगावरुन धडधडत जाऊन तिच्या चिंधड्या उडवणार, इतक्यात एका मुस्लिम बांधवानं या मुलीच्या दिशेनं धाव घेत जे धाडस केलं, त्याचं सर्वत्र कौतुक होतंय. याबाबतचा व्हिडीओही (Viral Video) समोर आला आहे. मोहम्मद मेहबुब (Mohammad Mehboob) असं मुलीचे प्राण वाचवणाऱ्या इसमाचं नाव आहे.ही घटना घडली आहे भोपाळमध्ये. कोणत्या क्षणी काय घडेल, याची काहीच श्वाश्वती नसते. त्यामुळे क्षणोक्षणी सतर्क राहणं, प्रसंगावधान बाळगणं, किती गरजेचं आहे, हे देखील या घटनेतून अधोरेखित झालंय.
भोपाळमध्ये कारपेंटरचं काम करणारा मोहम्मद मेहबूब हा आपल्या फॅक्टरीत जायला निघाला होता. फॅक्टरीत जायला वाटेत एक रेल्वे रुळ ओलांडून जावं लागतं. दरम्यान, ट्रेन येतेय म्हणून काही लोकं थांबले होते. तितक्याच मोहम्मद मेहबूबला एक मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडल्याचं दिसलं.
मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आहे, हे पाहून मेहबूब तडक तिच्या दिशेनं धावला. आपल्या जीवाची पर्वी करता, त्यानं तो स्वतः देखील मुलीचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर आडवा झाला. मुलगी प्रचंड घाबरली होती. पण वेळ इतका कमी होता, की तिला रेल्वे ट्रॅकवरुन बाहेर काढणं शक्य नव्हतं.
अखेर मोहम्मद मेहबूबनं मुलीचं डोकं एका हातानं धरलं. स्वतःदेखील रेल्वे ट्रॅकवर आडवा. या दोघांच्या अंगावरुन ट्रेन धडधडत जात होती. जराजरी हे दोघं रेल्वे ट्रॅकवरुन हलले असते, तर होत्याचं नव्हतं झालं असतं. पण मोहम्मदनं धीर करत या मुलीला रेल्वे ट्रॅकवर खाली थांबवलं. स्वतःही तिच्यासोबत तो थांबला आणि याच वेळी भरधाव मालगाडी रेल्वे ट्रॅकवरुन पास झाली. ही घटना थरकाप उडवणारी होती. पण मोहम्मद मेहबूबनं दाखवलेल्या धाडसामुळे एका लहान मुलीचा जीव वाचलाय.
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत 37 वर्षीय मोहम्मद मेहबूब जे करताना दिसलाय, ते निव्वळ कौतुकास्पद आहे, अशा कमेंट अनेकांनी केल्यात. त्याच्या धाडसाला आणि साहसाला सगळ्यांनीच सलाम केलंय. अनुराग द्वारी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला असून अनेकांनी हा व्हिडीओ रीट्वीट करत मेहबुबचं कौतुक केलंय. दरम्यान, ही मुलगी नेमकी रेल्वे रुळावर पडली कशी काय?, याचं उत्तर काही मिळू शकलेलं नाही.
Incredible bravery! 37 year old Mehboob was returning to his factory when he and some other pedestrians saw a goods train they stopped to let it pass a girl standing with her parents in fell on the tracks Mehboob sprinted dragged kept her head down @manishndtv @GargiRawat pic.twitter.com/IDqQiBLAv7
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) February 12, 2022
दास्तां–ए–मासूमियत..! चिमुरड्याचा ‘हा’ Video पाहून येणार लहानपणीची आठवण, तुम्ही केलंय का असं कधी?
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली, काळजात तू रुतली..; Viral झालेलं Srivalli marathi song ऐकलंत का?
#ishankishan : इशान किशन ठरला महागडा खेळाडू, मीम्स शेयर करत चाहत्यांचा सोशल मीडियावर धुमाकूळ