नवी दिल्ली : जगात कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार जीवाचे रान करीत असतात. परीक्षेत जास्त गुण मिळण्यासाठी उमेदवार दिवसरात्र झटत असतात. परंतू एका पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उमेदवार पास होण्याऐवजी नापास होण्यासाठी जुगाड करीत असतात. अशी कोणती परीक्षा आहे ज्यात नापास होणे हे पास होण्यापेक्षा चांगले मानले जाते. चला मग पाहूया नापास होण्यात आनंद वाटणारी परीक्षा कोणती ते ..
देशात एक अशीही परीक्षा असते, त्यात उमेदवारांना पास होण्यासाठी फारसा प्रयत्न करीत नाहीत. या परीक्षेत पास होण्याची कोणाचीही इच्छा नसते. ही परीक्षा असते रेल्वे लोको पायलट रिफ्रेशर कोर्स आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षेची. लाईन ड्यूटीवर जाण्यापासून वाचण्यासाठी या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची कोणाचीच इच्छा नसते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास लाईन ड्यूटीसाठी बाहेरगावी जावे लागते त्यामुळे लोको पायलटना या परीक्षेस उत्तीर्ण होण्याची इच्छा नसते.
झांसी रेल्वे मंडळात दोन हजाराहून अधिक लोको पायलट आहेत. या सर्व लोको पायलटचा वेळो वेळो रिफ्रेशर कोर्स करवून घेतला जातो. त्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते. जर उमेदवार लोकोपायलट या परीक्षेत पास झाले तर त्यांची ड्यूटी ट्रेनसाठी लावली जाते. जर फेल झाले तर त्यांना स्टेशनवरच इंजिन शंटींगची कामे दिले जातातय किंवा कोणत्यातरी इतर कामासाठी जुंपले जाते. झाशी रेल्वे मंडळात १३ असे पायलट आणि सहायक पायलट असे आढळले जे कधीच पास नाही झाले, त्यामुळे त्यांना कधीच बाहेरगावची लाईन ड्यूटी लागली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनास संशय आला. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनास संशय आला
ज्या लोको पायलटची ड्युटी लाइनवर असते, त्यांना बराच काळ घरापासून दूर राहावे लागते. घरापासून लांब न जाण्यासाठी काही लोको पायलट असे जुगाड करत असतात. हा प्रकार खूप दिवसांपासून सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. झाशी रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार सिंग यांनी सांगितले की, रेल्वे प्रशासनात वेळोवेळी विविध परीक्षा आणि अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. हाच नियम लोको पायलटना लागू होतो. प्राथमिक तपास सुरू असून, कोणी नियम मोडून वागल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.