नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानचे खाण्याचे वांदे झाले आहेत. पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटातून जात आहेत. येथे महागाईचा दर गेल्या सहा दशकांहून सर्वात निच्चांक पातळीवर आहे. येथील जनतेला सध्या पीठ, डाळी आणि रेशनिंग वाटले जात आहे. सरकार पीठ, डाळ, तांदूळ तेल, साबण आणि साखर वाटत आहे, या वस्तूं मिळवण्यासाठी लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. अशात पाकिस्तानच्या श्रीमंती व्यक्तीची माया आपल्यातील श्रीमंत मुकेश अंबानी याच्या मालमत्तेच्या तुलनेत कुठे आहे. पाहूयात…
सोशल मिडीयावर सध्या पाकिस्तानातील अनेक व्हिडीओ प्रसारीत होत आहे. एका व्हिडीओमध्ये तर तेथील लोकांच्या मध्ये जोरदार हाणामाऱ्या झाल्याचे स्पष्ठ झाले आहे. आता या सर्व वातावरणात पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत शाहीद खान यांची संपती किती अमेरिकन डॉलरची आहे. हे पाहूया. तसेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या संपत्तीच्या तुलनेत पाकिस्तानचे शाहीद खान यांचे काय स्थान आहे.
पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत..
पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव शाहीद खान असे आहे. त्यांचा जन्म 18 जुलै 1950 मध्ये झाला आहे. शाहीद खान हे फ्लेक्स एन गेटचे मालक आहेत. तसेच प्रसिद्ध उद्योगपती आणि स्पोर्ट्स टायकून आहेत. अमेरिकन कुश्ती प्रचार ऑल एलीट रेसलिंगचे सहमालकही आहेत.
अंबानी समोर कुठे टीकतात…
संपत्तीची तुलना केली तर शाहीद खान भारताच्या श्रीमंत व्यक्ती अंबानी यांच्यासमोर कुठेच टीकू शकत नाहीत. फोर्ब्सच्या मासिकानूसार शाहीद खान यांची संपत्ती एकूण 12.1 बिलियन डॉलर इतकी आहे. तर मुकेस अंबानी यांची संपत्ती 83.4 बिलियन ( अब्ज ) डॉलर आहे. मुकेश अंबानी जगातील श्रीमंताच्या यादीत 13 व्या क्रमांकावर आहेत, तर पाकिस्तानचे शाहीद खान यांचा नंबर 140 व्या क्रमांकावर आहे. तर आपल्या देशातील दुसऱ्या क्रमांकचे श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांची संपत्ती 44.3 अब्ज डॉलर आहे.
पाकिस्तानचे सध्याचे हाल
पाकिस्तानचे आर्थिक घडी संपूर्ण विस्कटली आहे. सध्या त्यांची अवस्था सर्वात खराब स्थितीत आहे. राजकीय घराण्यासोबत राजकीय परिस्थिती संपूर्ण डामाडोल झाली आहे. परकीय चलन रिकामे झाले आहे. महागाई वाढत चालली आहे. सरकार जवळ वाढती महागाई रोखण्याचा काही उपाय राहिलेले नाहीत आणि पाकिस्तानला जागतिक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समोर हात पसरावे लागत आहेत. पाकिस्तानची जनता सध्या हवालदील झाली आहे.