मुंबई : आपण सगळेच Whatsapp चॅटिंग करताना GIF वापरतो. यात आपण काही ठराविक GIF आपण वारंवार वापरतो. यातलं एक GIF सगळेच आवडीने वापरतात ते म्हणजे निळ्या रंगाचा टॉप घातलेली पाच-सहा वर्षांची मुलगी हसते आणि आपल्या डाव्या बाजूला बघते. हे GIF आहे, किलीया पोसी (Kailia Posey) हिचं. पण किलीया पोसी हिच्या चाहत्यांसाठी एक दुख:ची बातमी आहे. किलीया पोसीने आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने आपलं जीवन संपवलं आहे.
किलीया पोसी हिच्या चाहत्यांसाठी एक दुख:ची बातमी आहे. किलीया पोसीने आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने आपलं जीवन संपवलं आहे. तिच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. तिच्या निधनावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Kailia Posey, who became a popular GIF from her appearance on the reality TV show “Toddlers & Tiaras,” has died unexpectedly at age 16, her mom says pic.twitter.com/BVtBmUrQob
— BNO News (@BNONews) May 3, 2022
‘टॉडलर्स अँड टियारास’च्या कार्यक्रमामध्ये हसताना कॅमेऱ्यात किलीया पोसी कैद झाली. तिच्या हसण्याने तीने अनेकांचं लक्ष वेधलं. तिच्या या गोड हसण्याचं GIF बनलं आणि ती लोकप्रिय झाली. तिच्या हसण्याने अनेकांच्या भावनांना ‘चेहरा’ दिला. तिने मागच्या वर्षी मिस लिंडन टीन यूएसएचा किताब जिंकला होता.
किलीयाने 2018 च्या नेटफ्लिक्सवरच्या ‘एली’या चित्रपटात अॅग्नेसची भूमिका साकारली होती. तिने ‘टॉडलर्स अँड टियाराज’ या मालिकेत आईसोबत काम केलं. काही दिवसांपूर्वी तिने एक खतरनाक स्टंट केला होता. जमॅका इथल्या ओचो रियोस इथे स्टंट करतानाचा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या फोटोमध्ये ती टेकडीवरुन पाण्यात उडी मारताना दिसत आहे.
किलीयाच्या जाण्याने तिच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसलाय. त्यांनी किलीयाच्या चाहत्यांसाठी एक संदेश प्रसिद्ध केल आहे. पोसी कुटुंबीयांनी सांगितले की, ‘किलीया ही एक कर्तबगार मुलगी होती. तिने आपल्या कामगिरीच्या जोरावर नाव कमावलं. तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण तिने आपली जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय खूप लवकर घेतला. तिच्या जाण्याने आम्हाला अतिव दुख: झालं आहे. आम्हाला काही काळासाठी एकांत हवा आहे.”