मुंबई : जगभरात अनेक सापाच्या प्रजाती (Snake)आहेत. त्याचबरोबर जंगलात अधिक साप पाहायला मिळतात. सोशल मीडियावर खास काहीजण सापांचे व्हिडीओ टाकत असतात. त्याचबरोबर तो साप किती खतरनाक आहे हे सुध्दा सांगत असतात. आपल्याला काहीवेळेला ग्रामीण भागात गेल्यानंतर सुध्दा विषारी साप पाहायला मिळतात. काही सर्पमित्र सापाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. आतापर्यंत अनेक सर्पमित्रांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल (Amazing Viral Video) झाला आहे. एक मुलगा सापाला अडचणीतून बाहेर काढत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगला व्हायरल झाला आहे, त्यामध्ये एक मुलगा पाण्याच्या ठिकाणी बसला आहे, ते पाणी बहुतेक शेतीला जात असावं असा अंदाज आहे. त्याच्यासोबत तिथं दोन मुलं आहेत. तो मुलगा पाण्यातून सापाला हळूहळू बाहेर काढत आहे. ज्यावेळी तो साप बाहेर येतो, त्यावेळी तरुणाच्या शेजारी असणारे तरुण घाबरून बाजूला जात आहेत. तरुणाने आपला जीव धोक्यात घालून केवढा मोठा साप ताब्यात घेतलाय हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
ज्यावेळी तरुणाने पाण्यातून हळूहळू खेचून साप बाहेर काढला, त्यावेळी साप हवेत उडी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर तरुणाच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करीत आहे. सापाची उडी पाहून शेजारी असलेले दोन मित्र तिथून पळून गेले आहेत. त्यानंतर तो धाडसी तरुण त्या सापाला व्यवस्थित पकडून हाताळत आहे.
तरुण साप पकडत असल्याचं पाहून अनेकांना घाम फुटला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लटफॉर्मवरती व्हायरल सुध्दा झाला आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती सागर पाटिल नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सहा लाख लोकांना लाईक केला आहे. 76 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.