मुंबई : अधिकतर लोकं लग्नात आपल्याला चांगलं कायतरी खायला मिळेल या हेतुने जात असतात. त्यापैकी काही लोकं असे असतात, की त्यांना फक्त लग्नात मजा घ्यायची असते. लग्नात असताना अनेकदा पाऊस (trending news in marathi) आल्यानंतर मोठी अडचण निर्माण झाली आहे. अशावेळी लग्नात आलेल्या मंडळींना प्रचंड राग येत असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. त्यामध्ये एका कार्यक्रमात जेवायला आलेल्या लोकांनी पावसापासून वाचण्यासाठी मोठा जुगाड (Indian jugaad) केला आहे. त्या कार्यक्रमातल्या गाद्या त्यांनी डोक्यावर पकडल्या आहेत.
काही लोकं जेवायला बसली असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यावेळी पाऊस सुरु झाला आहे. पाऊस आल्यानंतर लोकं इतकं तिकडं पळतात. परंतु सध्या आलेल्या पावसामुळे कुणीही इतकं तिकडं गेल्याचं अजिबात दिसत नाही. पाऊस पडत असताना सुध्दा लोकं जेवणं करीत आहेत. पावसापासून वाचण्यासाठी लोकांनी तिथं आलेल्या गाद्या डोक्यावर घेतल्या आहेत. लोकांनी केलेला जुगाड सगळीकडं व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, भारतीय जुगाड करण्यात कुठेचं कमी नाहीत. पाऊस सुध्दा लोकांना खाण्यापासून रोखू शकत नाही. हा व्हिडीओ कुठल्या ठिकाणचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. व्हिडीओच्या कमेंटमध्ये काही लोकांनी हा व्हिडीओ राजस्थानमधील असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओे तीन लाख लोकांनी लाईक केला आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी कॉमेडी कमेंट केल्या आहेत. एक व्यक्तीने लिहीले आहे की, काहीही झालं तरी फुकटचं खाऊन जाणार असं वाटतंय. तर दुसऱ्याने व्यक्तीने लिहिले आहे की, ‘पाऊस पडतो, पाऊस पडतो पण अन्न सोडत नाही’. आणखी एका यूजरने लिहिले, ‘ये मस्त जुगाड है. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही खूप हसू आलं असेल.