मुंबई : साप (Snake) तर लोकांना रोज पाहायला मिळतो. गावाकडं तुम्ही शेतात किंवा इतर ठिकाणी ज्यावेळी फिरायला जाता. त्यावेळी तुम्हाला साप (Snake Viral Video) जरुर पाहायला मिळतो. काही साप विषारी असतात. ज्यावेळी एखादा मोठा साप समोर येतो, त्यावेळी लोकांची तारांबळ उडते. काहीवेळेला घरात साप शिरल्यानंतर सु्ध्दा अनेकांची भंबेरी उडालेली पाहायला मिळते. त्यावेळी वनविभागाच्या एखाद्या कर्मचाऱ्याला बोलावून सापाला ताब्यात घेतले जाते. सापांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (trending video) सुध्दा व्हायरल झाले आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
त्या व्हिडीओमध्ये एक साप रिक्षाच्या बाहेरच्या बाजूला फणा काढून उभा राहिला आहे. त्यावेळी तिथं असलेले अनेकजण त्या सापाजवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तो फणा काढून हल्ला काढण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये पाहायला मिळत आहे की, साप कशा पद्धतीने नंबर प्लेटला गुंडाळून उभा राहिला आहे. तो साप विषारी असल्यामुळे तिथं कोणी जाण्यास तयार नाही. त्या सापाला पाहायला लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी निघालेली मुलं सुध्दा त्या सापाला रस्त्याच्या पलिकडून पाहत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती d_shrestha10 नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २५ हजार लोकांनी पाहिला आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. त्या व्हिडीओला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया सुध्दा येत आहेत.
अनेकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर धक्कादायक व्हिडीओ असं म्हटलं आहे. काही लोकांनी असं म्हटलं आहे की, रिक्षाचा सुरक्षारक्षक साप झाला आहे. हा व्हिडीओ झारखंड राज्यातील असावा असा अनेक नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे.