VIDEO | सपना चौधरीचं गाणं 37 हजार फूट उंचीवर हवेत जोरात वाजवलं, तेव्हा लोकं नाचू लागले, व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Apr 21, 2023 | 2:46 PM

Viral Video | व्हायरल व्हिडीओमध्ये विमानात काही तरुण-तरुणी डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना पाहून लोकं म्हणतात, फेसम होण्यासाठी तुम्ही काहीही करता का ?

VIDEO | सपना चौधरीचं गाणं 37 हजार फूट उंचीवर हवेत जोरात वाजवलं, तेव्हा लोकं नाचू लागले, व्हिडिओ व्हायरल
viral news
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर काही व्हिडीओ पटकन व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होण्यासाठी लोकं काहीही करतात असं अनेकदा दिसून आलं आहे. सध्या तर अशी परिस्थिती आहे की, लोकं कुठंही डान्स करायला सुरुवात करतात. त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती त्यांचा डान्स मोबाईलमध्ये कैद करतो. सद्या विमानातला एक व्हिडीओ नुकताचं व्हायरल (Passengers Dancing In Flight Video) झाला आहे. त्यामध्ये काही तरुणी-तरुणी डान्स करीत आहेत. प्रवासी (Passengers) हरियाणामधील एका फेसम गाण्यावरती डान्स करीत आहेत. प्रवाशांनी जबरदस्त डान्स केल्यामुळे त्याचा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एक वेगळीचं चर्चा रंगली आहे.

हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती अधिक व्हायरल झाला आहे. प्रवासी ज्या विमानात डान्स करीत आहेत. त्या विमानात मागच्या बाजूला एक मोठा स्पिकर एका व्यक्तीने हातात पकडला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना असं वाटतं आहे की, प्रवाशांनी विमानाला डान्सचं स्टेज बनवलं आहे. हा व्हिडीओ कधी बनवला आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

हे सुद्धा वाचा

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया भयानक

विमानाच्या आतमध्ये सपना चौधरी “तेरी आंख का यो काजल” या गाण्यावर प्रवास करणाऱ्या एक ग्रुपने तुफान डान्स केला. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यावर अनेकजण कमेंट करीत आहेत. त्याचबरोबर तो व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. एका एंकर जेके नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर लोकं चांगल्या आणि वाईट दोन्ही पद्धतीच्या कमेंट करीत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “पीओव्ही – सपना चौधरीचे गाणे हवेत 37,000 फूटांवर कसे हिट होते…” अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिली आहे, तर इतर अनेकांनी व्हिडिओवर सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि इतरांवर टीका केली आहे. प्रवाशांना धोका निर्माण झाल्याची टीका प्रवाशांकडून केली आहे.