मुंबई : लग्न (marriage) वेळेवर लागावं यासाठी वधू आणि वर यांच्या कुटुंबियांकडून (Family) तंतोतंत पालन केलं जातं. परंतु काही वेळेला अशी अडचण निर्माण होते की, लग्नाच्या वेळेत पोहोचण्यास वधूला किंवा वराला पोहोचता येत नाही. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांमध्ये काहीवेळेला वाद सुध्दा झाले आहेत. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यामध्ये वराला येण्यास उशिर झाल्यानंतर नववधूनी जे काही केलं, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये लग्नासाठी नवरदेवाला यायला उशिर होणार असल्याचं समजल्यानंतर वधूने सगळ्या परंपरा सोडून खाण्यावर ताव मारला आहे. प्रचंड भूक लागल्यामुळे वधू आपल्या आवडीचं जेवणं खात आहे. त्याचबरोबर माझ्या सासरच्या लोकांना माझी सवय माहित असल्याचं सुद्धा वधूने सांगितलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
तो व्हिडीओ अनेक लोकांना आवडला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओच्या खाली अनेकांनी कमेंट सुध्दा केली आहे. विविध पद्धतीच्या मजेशीर कमेंट आल्या आहेत. नेटकरी एकमेकांना त्यावर मजेशीर कमेंट करीत आहेत.
त्या व्हिडीओला the_streetfood_center या युझरने इंन्स्टाग्रामवरती शेअर केला आहे. एका युझरने त्यावर एक कमेंट केली आहे, त्यामध्ये त्याने लिहिलंय “एका मुलीने मजा घेतली पाहिजे, मग तो तिच्या लग्नाचा दिवस का असेना.” आतापर्यंत त्या व्हिडीओला
77 हजार लोकांनी लाईक केलं आहे. लोकं तो व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहत आहेत.