स्टारबक्सच्या लोगोमध्ये दिसणारी ‘ती’ मुलगी कोण? तिच्याबाबत कंपनीने स्पष्टच सांगितलं
स्टारबक्सचा लोगोवरून कंपनीची ओळख दिसून येते. प्रत्येक कंपनीच्या लोगो काही ना काही विशेष कारणावरून तयार केलेला असतो. स्टारबक्सच्या हिरव्या रंगात दिसणाऱ्या तरुणींचं असंच काहीसं आहे. यामागचं कारण खुद्द कंपनीने आपल्या वेबसाईटवर स्पष्ट केलं आहे.
1 / 5
स्टारबक्स हा जगातील एक नामांकित लक्झरी बेवरेज ब्रँड आहे. जगातील 84 देशात 34,630 स्टोअर्स आहेत. भारतात या ब्रँडची एन्ट्री 2012 मध्ये झाली होती. गेल्या दहा वर्षात भारतात 252 फ्रेंचाईसी आहेत. या कंपनीच्या लोगोत दिसणाऱ्या तरुणीबाबत वेगवेगळी कारणं सांगितली जातात. मात्र कंपनीने या लोगोबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
2 / 5
कंपनीने गेल्या 50 वर्षात ब्रँडिंग आणि क्वालिटीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यात कंपनीने 5 दशकात 4 वेळा लोगोचं डिझाईन बदललं. हा लोगो कधी काळी ब्राउन होता. आता हिरव्या रंगात हा लोगो दिसत आहे. या लोगोत एक तरुणी दिसते. तिच्याबाबत कायमच आकर्षण राहिलं आहे.
3 / 5
स्टारबक्सच्या अधिकृत वेबसाईटनुसार लोगोत दिसणारी तरुणी एक पौराणिक कॅरेक्टर आहे. ती काही वास्तविक तरुणी नाही. सिरेनला पौराणिक कथेनुसार दोन शेपट्या दाखवण्यात आलं आहे. 1971 मध्ये कंपनीने फाउंडर हर्मन मेलविलच्या कादंबरी मोबि-डिकने प्रभावित झाले. त्यानी यातून स्टारबक्स हे नाव घेतलं. त्यानंतर लोगो बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली.
4 / 5
समुद्रातील जलपरीबाबत कायमच ऐकलं गेलं आहे. हे रहस्यमय पात्र असून तिला सायरन या नावाने ओळखलं जातं. कंपनीच्या तीन फाउंडर्सनं या पात्राला पसंत केलं. या पात्रापासून प्रेरणा घेत तरुणीचं लोगो तयार केला.
5 / 5
या लोगोचं समुद्र कनेक्शनचं एक कारण म्हणजे स्टारबक्सचा पहिलं स्टोर अमेरिकेतील सिएटलमध्ये ओपन केलं गेलं. हे स्टोर समुद्र किनारी आहे. फाउंडर्सच्या मते, आमच्या शहराचं कायमच पाण्याशी नातं राहिलं आहे. त्यावेळेस लांब प्रवास सिएटलला पोहोचावं लागत होतं. त्यामुळे जलपरीचा लोगो सामिल केला गेला.