आग्रा : जगातील सात आश्चर्यांपैकी (Seven wonders)एक आहे तो ताजमहल. पांढऱ्या शुभ्र संगमरवी दगडाचा हा ताजमहल फक्त प्रेमाचे प्रतिकच नाही तर सौंदर्याचेही प्रतिक मानले जाते. पांढऱ्या शुभ्र ताजमहल प्रमाणेच काळा ताजमहल आपल्याला पहायला मिळाला असता. ‘काळा ताजमहल’ बांधण्याचे शाहजहांचे स्वप्न होते. मात्र, त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. या मागे अनेक कारण आहेत.
मुघल बादशाह शाहजहानने आपली पत्नी मुमताजची आठवण म्हणून ताजमहल बांधला. भव्यता आणि सुंदरतेमुळे ताजमहल जगभरात ओळखले जाते.
मुघल स्थापत्य शैलीचे अप्रतिम उदाहरण म्हणूनही ताज महलकडे पाहिले जाते. ताज महल हे मानवी कला आणि कार्याचे उत्कृष्ट नमुना म्हणून देखील ओळखला जातो. ताज महलच्या मुख्य इमारतीच्या मध्य भागी मुघल बादशहा शहाजहान ची पत्नी मुमताज बेगम ची समाधी आहे.
इतिहासात पांढऱ्या ताजमहालसोबत काळ्या ताजमहालचाही उल्लेख आहे. मात्र, काळा ताजमहल बांधण्याचे शाहजहांचे स्वप्न अर्थवट राहिले.
आग्रा येथील ताजमहलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शाहजहानला दुसरा ताजमहाल बांधायचा होता. हा ताजमहल पूर्णपणे काळा असेल. काळ्या दगडांनी ताजमहाल बांधण्याची शहाजहानची इच्छा कधीच पूर्ण झाली नाही.
शाहजहानला काळ्या संगमरवराने आणखी एक ताजमहाल बांधायचा होता. हा ताजमहल खूपच भव्य असा असणार होता विशेष म्हणजे यांची रचना ताजमहाल सारखी असणार होती.
मुमताजसाठी बांधलेल्या ताजमहालच्या मागे यमुना नदीच्या पलीकडे असलेल्या महताब बाग परिसरात हा काळा ताजमहाल बांधला जाणार होता असा दावा केला जात आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, शहाजहानची पत्नी मुमताजची समाधी ताजमहालमध्ये बांधण्यात आलेय. शहाजहानला स्वतःची समाधी या काळ्या ताजमहालमध्ये बांधायची होती.
मात्र, शाहजहानचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. काळा ताजमहल बांधण्याची योजना आखत असतानाच शहाजाहनचा औरंगजेबाशी संघर्ष सुरू झाला. औरंगजेबाने शाहजहानला नजरकैदेत ठेवले यामुळे त्याचे स्वप्न अधुरे राहिले.
युरोपियन लेखक जीन-बॅप्टाइझ टॅव्हर्नियर यांनी याबाबत दावा केला आहे. तर, काही संधोधकांनी काळा ताजमहल उभारणीचा दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे म्हंटले आहे.