“मला माझ्या प्रियकराला भेटवा…”, मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये महिला चढली टॉवरवर, मग…

| Updated on: Jul 18, 2023 | 3:56 PM

VIRAL NEWS : महिला प्रियकराला भेटण्यासाठी आतूर झाली आहे. त्यामुळे ती महिला तिथं असलेल्या एका टॉवरवरती चढली आहे. ज्यावेळी त्या महिलेला आश्वासन देण्यात आलं. त्यावेळी ती महिला खाली उतरली आहे.

मला माझ्या प्रियकराला भेटवा..., मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये महिला चढली टॉवरवर, मग...
SHIVPURI NEWS
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शिवपुरी: एका महिलेने तीन तास नाटक केल्याचा प्रकार सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) चांगलाचं व्हायरल झाला आहे. ही घटना मध्यप्रदेश राज्यातील शिवपुरी (SHIVPURI NEWS) जिल्ह्यातील आहे. हा सगळा प्रकार त्या गावातील लोकांनी पाहिला आहे. ही घटना पनघंटा गावातील आहे, ती लग्न झालेली महिला एका टॉवरवरती चढली आहे. त्या महिलेने टॉवरवरती चढल्यानंतर तीन तास नाटकं केलं. त्या महिलेला पोलिसांनी खूप मोठ्या कष्ठाने उतरवलं आहे. त्या महिलेला खाली उतरवत असताना पोलिसांना (MP police) सुध्दा घाम फुटला आहे. ९ कर्मचारी त्या महिलेला खाली उतरण्यासाठी विनवण्या करीत होते. शेवटी त्या व्यक्तीला आणण्याचं आश्वासन दिल्यानंतर ती महिला खाली उतरण्यास तयार झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मगरोनी चौकीच्या अंतर्गत हे प्रकरण येत आहे. पनघंटा गावातील लग्न झालेली एक महिला गावातील एका टॉवरवरती चढली. त्या महिलेने तिच्या प्रियकराला भेटायचं आहे असं सांगितलं. पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी त्या महिलेला समजवत होते, परंतु ती महिला खाली उतरण्यास तयार नव्हती. ती महिला अडून बसली होती. शेवटी पोलिसांनी आश्वासन दिलं. मग ती महिला खाली उतरली.

हे सुद्धा वाचा

पोलिस अधिकारी दिपक शर्मा यांनी सांगितलं की, ती महिला टॉवरवरती चढली होती. ती आपल्या प्रियकराला बोलवा अशी मागणी करीत होती. पोलिसांनी आणि प्रशासनाने त्या महिलेला अधिक समजवलं त्यानंतर ती महिला खाली उतरली आहे. ती महिला अधिक चिंतेत होती. त्याचबरोबर ती महिला हताश सुध्दा झाली होती. पोलिसांनी खूप समजवल्यानंतर ती खाली उतरली आहे. पोलिसांनी त्या महिलेला जबदस्तीने उतरवण्याचा प्रयत्न केला असता तर, दर्घटना घडली असती असंही सांगितलं आहे.