मुंबई : सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Woman Does A Somersault In Metro Coach) झाला आहे. तो व्हिडीओ दिल्लीचा (Delhi Metro) असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर इ्तका व्हायरल झाला आहे की, लोकांनी त्या व्हिडीओ असंख्य कमेंट केल्या आहेत. आतापर्यंत दिल्लीच्या मेट्रोतील (Delhi Metro Rail Corporation) अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही लोकं प्रसिध्द होण्यासाठी मेट्रोत डान्स करीत आहेत. तर काही लोकं प्रसिध्द होण्यासाठी चुकीच्या पध्दतीचे व्हिडीओ करीत आहे. सध्याचा एक व्हिडीओ एका मुलीने चुकीच्या पध्दतीने तयार केला असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. दिल्ली मेट्रोने अशा पद्धतीने व्हिडीओ तयार करु नयेत असं बजावलेलं असताना सुध्दा तरुण तरुणी व्हिडीओ तयार करीत असताना पाहायला मिळत आहे.
मेट्रोच्या आतमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. याच्याआगोदर सुध्दा अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्याचा व्हिडीओ अनेकांचं लक्ष खेचत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगी गर्दीत स्टंट करीत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४४ हजार लोकांनी लाईक केला आहे. ज्यांनी व्हिडीओ पाहिला अशी लोकं त्या व्हिडीओ कमेंट सुध्दा करीत आहेत.
एका व्यक्तीने लिहीलं आहे की, हे कायद्याच्या अनुशंगाने नाही, आता हे सगळं सार्वजनिक वाहतुकीत पाहायला मिळत आहे. संभाळून करा, चांगलं केलं आहेस. काही लोकांनी त्या मुलीचे वाभाडे कमेंटच्या माध्यमातून काढले आहेत.
दिल्लीच्या मेट्रोत व्हिडीओ बनवण्याचं प्रमाण अधिक असल्यामुळं त्यांनी प्रवाशांना नियम आणि मर्यादा पाळण्याचे आवाहन केलं आहे. काही लोकांनी त्या मुलीला कमेंटच्या माध्यमातून अधिक सुनावलं आहे. दिल्ली मेट्रो प्रशासनाने जाहीर केलं आहे की, सगळ्या प्रवाशांना हे निश्चित करायला हवं की, आपल्यासोबत प्रवासी करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्रास झाला नाही पाहिजे.