मुंबई : सध्या एकमेकांमध्ये पदार्थ मिक्स करुन वेगळं काय तरी करण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. लोकं काही अशा गोष्टी करीत आहे की, नेटकरी त्यांच्यावरती (TRENDING NEWS) संताप व्यक्त करीत आहेत. तुम्ही पराठा नक्की खाल्ला असेल. पराठा तयार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही लोकं साधा पराठा खातात, तर काही लोकं बटाटा पराठा खातात, काही लोकं वाटाणा पराठा (PAROTA) खातात. तुम्ही कधी मॅगी (MAGGY PAROTA) पराठा खाल्ला आहे का ? पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर चांगल्या आणि वाईट कमेंट आल्या आहेत. एका महिलेने पराठा बनवणाऱ्या महिलेला अधिक सुनावलं आहे.
त्या व्हिडीओमध्ये एका महिलेने सुरुवातीला एक रोटी तयार केली आहे. त्यावर तयार केलेली मॅगी ठेवली आहे. त्यानंतर त्या मॅगीवरती एक अर्धी भाजलेली रोटी ठेवली आहे. त्यानंतर हे सगळे तव्यावर ठेवलं आहे. ती महिला तो पराठा भाजत आहे. काहीवेळाने मॅगी पराठा तयार झाला आहे. काहीवेळाने ती महिला पराठा कापत आहे. ज्यावेळी ती महिला एका प्लेटमध्ये पराठा भरण्याच्या आगोदर मॅगी दाखवत सुध्दा आहे. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर यापूर्वी सुद्धा व्हायरल झाले आहेत. लोकांनी त्या महिलेला खूप सुनावलं असल्याचं कमेंटमध्ये दिसत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर testy_fun नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ १५ मिलियन लोकांनी पाहिला देखील आहे. या व्हिडीओ 3 लाख 78 हजार लाईक सुध्दा केले आहे.
हा व्हिडीओ पाहून लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. एक व्यक्तीनं कमेंटमध्ये लिहीलं आहे की, माझा सगळा मूड खराब केला आहे. दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, बहिणीनं मॅगी ज्यूस सुध्दा प्यायला पाहिजे होता. आणखी एकाने म्हटले आहे. मॅगीवरती सगळे प्रयोग का करीत आहेत. बस्सं हे बघायचं राहिलं होतं.