मुंबई : सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. म्हणजे लोकांना कधी काय आवडेल हे सुध्दा कोणी सांगू शकत नाही. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्याचा व्हिडीओ (video viral) हा लोकांच्या अधिक पसंतीला पडला आहे. सध्या तुम्ही दुकानात कुठलीही गोष्ट खरेदी करण्यासाठी गेला, तर पहिलं तिथं ऑनलाईन पेमेंट व्यवस्था आहे का ? हे पाहतो. कारण सगळीकडं आणि UPI पेमेंट लोकं करीत आहे. प्रत्येक व्यक्तीचा QR कोड वेगळा आहे. भाजी विक्रेत्या एका महिलेचा क्यूआर (QR)कोड चांगलाचं चर्चेत आहे.
तुम्ही कुठल्याही दुकानात गेल्यानंतर तुम्हाला तिथल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात ठेवलेला क्यआर कोड पाहायला मिळेल. त्याचबरोबर दुकानाच्या टेबलावरती सुध्दा क्यूआर कोडची मशीन पाहायला मिळते. सध्या आजीबाईंचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आजीबाई रस्त्यात भाजी विकत आहेत. ते ठिकाण कोणतं आहे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्या आजीबाईनी वजनाच्या पाठीमागे क्यआर कोड लावला आहे. त्यामुळे त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सध्याचा व्हिडीओ maharashtra.farmer या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. काही वेळात हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 12.6 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर व्हिडीओला 1.4 मिलियन लाइक्स सुध्दा मिळाले आहेत. त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्मार्ट मावशी असं म्हटलं आहे. सध्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.