VIDEO | महिलेच्या कपाळावर नवऱ्याच्या नावाचा टॅटू, व्हिडिओ 12 मिलियन लोकांनी पाहिला

| Updated on: May 23, 2023 | 10:27 AM

Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला आपल्या कपाळावरती टॅटू काढत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये महिला आपल्या कपाळावरती पतीच्या नावाचा टॅटू काढत आहे.

VIDEO | महिलेच्या कपाळावर नवऱ्याच्या नावाचा टॅटू, व्हिडिओ 12 मिलियन लोकांनी पाहिला
Tattoo Viral Video
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : काही लोकांना टॅटू (Tattoo Viral Video) काढण्याचं इतकं वेड असतं की, ते प्रत्येकवेळी नवा टॅटू (Tattoo) काढत असतात. काही लोकं आपल्या पाळीव प्राण्यांच्या आठवणीसाठी टॅटू काढत असतात. तर काही लोकांना आपल्या आई-वडिलांचा टॅटू काढणं आवडतं. सध्या एका महिलेच्या टॅटूची सगळीकडं चर्चा सुरु आहे. एका महिलेनं आपल्या पत्नीचं नावं गोंदवून सगळ्याचं लक्ष वेचलं आहे. हा व्हिडीओ (Viral Video) लोकांना इतका आवडला आहे की, 12 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर अधिक लोकांनी त्या व्हिडीओला कमेंट सुध्दा केल्या आहेत.

लोकं प्रेम दाखवण्यासाठी टॅटू तयार करतात

वर्तमान काळात अधिकतर लोकं प्रेम दाखवण्यासाठी टॅटू तयार करतात. जी लोकं आयुष्यभर सोबत राहणार आहेत, अशी लोकं टॅटू तयार करतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका महिलेने आपल्या कपाळावरती टॅटू तयार केला आहे. हे पाहून नेटकऱ्यांना त्यावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे.

हे सुद्धा वाचा

कपाळावर बनवला टॅटू

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने आपल्या कपाळावरती टॅटू बनवला आहे. बेंगलूरमधील किंग मेकर टॅटू स्टुडिओने हा व्हिडीओ शेअर केला आहे. टॅटू प्रेमी अनेकदा हातापासून छातीपर्यंत आणि पाठीवर टॅटू काढताना दिसतात. अशातचं एका महिलेने आपल्या कपाळावर टॅटू तयार करुन सगळ्यांना शॉक दिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे.

व्हिडीओ 12 मिलियन लोकांनी पाहिला

व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेचतं आहे. हा व्हिडीओ २५ लाख लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी याला नकली टॅटू म्हणत आहेत. काही लोकांनी टॅटू तयार करुन खरं प्रेम व्यक्त केलं असल्याचं सांगितलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी हा दिखावा असल्याचं म्हटलं आहे. हा एक प्रकारचा मजाक असू शकतो असं काही लोकांनी म्हटलं आहे.