Kedarnath Viral Video : केदारनाथ मंदिर गाभाऱ्यात महिलेने उडवले पैसे, व्हायरल व्हिडीओमुळे भाविकांचा संताप

| Updated on: Jun 19, 2023 | 7:00 PM

केदारनाथ हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरात जाण्यासाठी भाविक आतूर असतात. पण या मंदिर गाभाऱ्यातील एक व्हिडीओ पाहून आता संतापाची लाट उसळली आहे.

Kedarnath Viral Video : केदारनाथ मंदिर गाभाऱ्यात महिलेने उडवले पैसे, व्हायरल व्हिडीओमुळे भाविकांचा संताप
Kedarnath Viral Video : केदारनाथ मंदिर गाभाऱ्यात महिलेने उडवले अशा पद्धतीने पैसे, व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर भाविक भडकले
Follow us on

मुंबई : देशात 12 ज्योर्तिलिंगापैकी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर एक आहे. या मंदिराबाबत अनेक गूढ रहस्य सांगितली जातात. भयंकर प्रलयातही ही मंदिर जैसे थे असल्याने एक दैवी चमत्कार असल्याचं सांगितलं जातं.केदारनाथ धाम मंदिरात एका मागोमाग एक वाद होत आहे. एक वाद शमत नाही तोच दुसरा वाद डोकं वर काढून असतो.नुकताच केदारनाथ मंदिर गाभाऱ्यात सोन्याची पॉलिश करण्यावरून वाद झाला होता. आता आणखी एका व्हिडीओने वाद उफाळून आला आहे. यावेळी निमित्त ठरलं ते केदारनाथ गाभाऱ्यात महिलेने उडवलेले पैसे..हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक महिला ज्योर्तिलिंगावर पैसे उडवताना दिसत आहे. या महिलेसोबत तिथे काही पुजारी उपस्थित असल्याचं दिसत आहेत. त्यांनी महिलेची कृती पाहून तिला अडवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिडीओ एक आठवड्यापूर्वीचा असून दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील महिला कोण? हे अद्याप अस्पष्ट आहे.

कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मंदिरातील हा प्रकार पाहून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महिलेने पैसे उडवल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. इतकंच काय तर महिलेच्या जवळ उभे राहून पुजारी मंत्रोच्चारण करत असल्याचं दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओनंतर बदरी केदार मंदिर समितीने दखल घेत तपासाचे आदेश दिले आहेत. समितीने सांगितलं की, “या व्हिडीओची दखल घेतल डीएम मयुर दीक्षित आणि पोलीस अधीक्षक यांन व्हिडीओची तपासणी करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर बदरी केदार धामच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.”

दुसरीकडे, केदारनाथ मंदिर गाभाऱ्यात पैसे उडवल्याप्रकरणी रुद्रप्रयाग डीएम मयुर दीक्षित यांनी महिलेविरुद्ध एफआयआर करण्याचे आदेश दिले आहेत. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत विचारणा करण्यात आली आहे.