Eating salad with rabbit : सोशल मीडियावर (Social media) आपल्याला नेहमीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळते. आता सॅलडच्या कॉम्पिटिशनचा (Competition) एक व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे. यामध्ये खास असलेल्या यूएस फूड चेनने ससा आणि महिला यांच्यात खाण्याची स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धा जिंकण्यासाठी विजेत्याला सर्वाधिक सॅलड 10 मिनिटांत पूर्ण करावे लागले. सशाशी स्पर्धा करणारी महिला रैना हुआंग होती, ती एक सोशल मीडिया सेलिब्रिटी होती. कॅलिफोर्नियाच्या आउटलेटमधील चॉप स्टॉपच्या ग्लेनडेलच्या पार्किंग लॉटमध्ये आयोजित केलेल्या या बहुप्रतीक्षित कार्यक्रमात 1 फेब्रुवारीला तो शोडाउन पाहण्यासाठी लोक प्रचंड उत्साही दिसले. फूड अँड वाइन मॅगझिननुसार, हुआंगने 10 मिनिटांत 3.5 पौंड (1.5 किलोग्रॅम) सॅलड पूर्ण केल्यानंतर ती विजेती म्हणून घोषित करण्यात आली. त्याचवेळी तिची स्पर्धक हनीने केवळ सॅलडचा वास घेऊन त्याला सोडून दिले.
हनी सॅलडमध्ये रस घेत नसल्याचे पाहून आयोजकांनी हनीऐवजी प्रेशियस नावाचा दुसरा ससा मैदानात उतरवला. पण त्यानेही सॅलडमध्ये रस दाखवला नाही. यानंतर रेफरीने रैनाचा हात वर करून तिला विजेता घोषित केले. इव्हेंटबद्दलच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, चॉप स्टॉपने लिहिले, “आम्ही सिद्ध केले, की सॅलड्स हे काही सशाचे अन्न नाही. ज्यांना निरोगी खाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ते स्वादिष्ट अन्न आहेत. तर स्पर्धेनंतर, हुआंगने रॉयटर्सला सांगितले, “ही माझ्यासाठी एक स्पर्धा होती”. ती पुढे म्हणाली की सॅलड हे पटकन खाण्यास कठीण अन्न आहे. कारण ते चघळत राहावे लागते.
न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या दोन सशांचे मालक लुई मोसेस म्हणाले, की ते हारले हे धक्कादायक नाही. ससे दिवसभर हळूहळू चघळत अन्न खातात. ते कुत्र्यांसारखे नाहीत जे एकाच वेळी अन्न संपवतात. त्याच वेळी, या स्पर्धेच्या विजेत्या रैनाने सांगितले, की तिला तिच्या स्पर्धकांवर हसू येत होते. दोघेही सॅलडला हात लावत नव्हते. स्पर्धेव्यतिरिक्त रैनाने सॅलडला हातही लावला नाही.
Lettuce-loving giant rabbit Honey ‘Mega’ Bunny lost to competitive eater Raina Huang at a salad-eating contest in California pic.twitter.com/3yTfNiVKt8
— Reuters (@Reuters) February 3, 2022
या स्पर्धेबद्दल रैना म्हणते, की ही आव्हाने स्वतःसाठी आहेत. ती स्वतःला आव्हान देते. जेव्हा ती अशा आव्हानात भाग घेते तेव्हा ती तिच्या स्पर्धकाऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करते. जिंकणे किंवा हरणे यापेक्षा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करते. या स्पर्धेत सशांनी सॅलडला हात लावला नसला तरी रैनाने यानंतरही आपला वेग कमी केला नाही आणि अवघ्या 10 मिनिटांत दीड किलो सॅलड फस्त केले.