Viral News : प्रियकरावर आंधळेपणाने विश्वास ठेवायची, प्रेयसी म्हणते’सहनही होईना आणि सांगताही येईना’

| Updated on: Sep 16, 2023 | 11:08 AM

Trending News : प्रेम आंधळं असतं असं सगळेचं आपल्या आजूबाजूला म्हणत असतात. परंतु एका तरुणीवर अति विश्वास ठेवणं अंगलट आलं आहे. पण प्रियकराचा कारनामा पाहिल्यानंतर संतापलेल्या प्रेयसीने...

Viral News : प्रियकरावर आंधळेपणाने विश्वास ठेवायची, प्रेयसी म्हणतेसहनही होईना आणि सांगताही येईना
Trending News
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : सद्याचं युग अधिक जलद (Viral News) असल्याचं अनेकजण म्हणतात. त्यामध्ये मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे. कारण आपली अनेक कामं आपल्या मोबाईलवरती (Trending News) अवलंबून आहेत. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मदत करणारा मोबाईल, प्रत्येकवेळी मदत करेल असं नाही. काहीवेळा मोबाईल अशी परिस्थिती निर्माण करतो की, त्यामुळे तुमचे संबंध दुरावले जातात. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (trending news) एक चर्चा जोरदार सुरु आहे. एका प्रेयसीला आपल्या प्रियकरावर अधिक विश्वास ठेवणं नडलं आहे. तिची सध्याची परिस्थिती ‘सहनही होईना आणि सांगताही येईना’ अशी आहे.

सध्या ज्या गोष्टीची सगळीकडं चर्चा सुरु आहे. ती अमेरिकेत राहणाऱ्या लिलीची चर्चा सुरु आहे. त्या तरुणीने सोशल मीडियावर एक गोष्ट शेअर केली आहे. ज्या लोकांनी त्या तरुणीची स्टोरी वाचली आहे, त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी त्या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ती तिच्या प्रियकरावर अधिक प्रेम करीत होती. त्याचबरोबर त्याच्यासोबत तिला आयुष्य काढायचं ती विचार करीत होती. तिला असं वाटायचं की तिचा मित्र फक्त तिच्यावर प्रेम करीत आहे. ज्यावेळी त्या तरुणीला रात्रीची जाग आली. त्यावेळी तिने त्या तरुणाचा मोबाईल चेक केला. मोबाईल पाहिल्यानंतर प्रेयसीला जोराचा धक्का बसला.

या कारणामुळे उडाला विश्वास

त्या तरुणीने लिहीलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, तिचा प्रियकर दोस्तांच्यामध्ये फक्त माझीचं चर्चा करीत होता. तो प्रेयसीची दोस्तांमध्ये मस्करी करीत होता. त्याने त्याच्या काही मित्रांना सांगितलं आहे की, तो तिला अजिबात झेलू शकत नाही. त्याचबरोबर माझ्या सोसायटीत मी तिला सहन देखील करु शकत नाही. हे सगळं मोबाईलमध्ये पाहिल्यापासून ती मुलगी स्वत:ला सावरु शकलेली नाही.

हे सुद्धा वाचा

त्या मुलीने इतर मुलींना सल्ला दिला आहे की, सगळ्या मुलींना आपल्या बॉयफ्रेंडचा मोबाईल चेक करायला पाहिजे. मला सु्ध्दा त्याचा असाचं मोबाईल चेक करायला पाहिजे होता. मी आगोदर मोबाईल पाहिला असता, मी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवला नसता.