world idli day : एक वर्षांत पट्टयाने सहा लाख इ़डलींची ऑर्डर दिली, स्विगीने केली आकडेवारी जाहीर

| Updated on: Mar 30, 2023 | 9:35 PM

इडली आणि खोबऱ्याची चटणी पाहीली की तोंडाला एकदम पाणीच सुटते. अशा चटकदार डीशची मागणी किती आहे याची मजेशीर आकडेवारी स्विगीने जाहीर केली आहे.

world idli day : एक वर्षांत पट्टयाने सहा लाख इ़डलींची ऑर्डर दिली, स्विगीने केली आकडेवारी जाहीर
IDLI
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली :  इडली आणि डोसा आता संपूर्ण भारतीयांचा आवडता खाद्यप्रकार झाला आहे. इडलीसाठी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांच्या उड्या पडतात. सकाळच्या नाश्त्यात इडलीला देशभरात सकस अन्न म्हणून मान्यता मिळाली आहे. या हेल्दी डीशचे दिवाणे इतके आहेत की 30 मार्च आता ‘जागतिक इडली दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत फूड डीलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने एक मजेशीर आकडेवारी जारी केली आहे, त्यात एका पट्टयाने चक्क एका वर्षांत सहा लाख रूपयांपेक्षा अधिक इडली ऑर्डर करून फस्त केल्याचे उघडकीस आले आहे.

वर्ल्ड इडली डेच्या निमित्ताने ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने एक आकडेवारी शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की 30 मार्च 2022 ते 25 मार्च 2023  पर्यंत तब्बल 33 मिलीयन प्लेट इडलीची डिलिव्हरी झाली आहे. त्यामुळे इडलीला किती पसंत केले जात आहे ही आकडेवारीच सांगत आहे. हैदराबाद येथील एका युजरने एकट्याने एक वर्षांत सहा लाख रूपयांच्या इडल्या ऑर्डर केल्याचे उघडकीस आले आहे. इडली या हेल्दी डीशला ऑर्डर करण्यात देशातील चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद सारखी शहरे आघाडीवर आहेत. आपल्या आकडेवारीत स्विगीने म्हटले आहे की कस्टमरने सकाळी नाश्त्याच्या वेळेत स. 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान इ़डली ऑर्डर केली आहे. म्हणजेच नाश्त्यासाठी इडली किती आवडीचा पदार्थ असल्याचे स्पष्ठ होत आहे.

इडली सोबत लोकांना हे खाद्यपदार्थ आवडतात

स्विगीच्या आकडेवारीनूसार रवा इडलीला बंगलोरमध्ये सर्वाधिक पसंद केले जात आहे. घी/ नेयी करम पोडी इडली, मिनी इडली आणि थट्टे इडली यांना तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणात मागणी आहे. स्विगी कंपनीने म्हटले आहे की इडली लव्हर्सना इडली सांभार, सागू, तूप, लाल चटणी, खोबरा चटणी, करमपुरी आणि चहा बरोबर खाण्यासाठी खूप आवडते. याशिवाय आकडेवारी हे ही सांगते की मसाला डोसा याच्या नंतर इडलीला लोक जास्त पसंद करतात.

इंडोनेशियात लागला इडलीचा शोध

इडली केवळ फेमस साऊथ इंडीयन डीश नसून ती एक हेल्दी डीश असल्याने भरपेठ नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहार आहे. या डीशला सर्वात आधी इंडोनेशियात बनविण्यात आले होते. त्याला तेथील लोक ‘स्टीम केक’ म्हणायचे. या स्टीम केकला मसालेदार खोबरा पावडर बरोबर सर्व्ह केले जायचे असे म्हटले जाते.