स्टायलिश शर्ट, कडं आणि हातात गिटार… पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले रॉकस्टार, कशामुळे झाली ही किमया; वाचा इंटरेस्टिंग न्यूज…

| Updated on: May 01, 2023 | 5:14 PM

Artificial Intelligence : पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, बराक ओबामा,असे अनेक राजकीय नेते जर रॉकस्टार असते तर ते कसे दिसले असते, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? AI ने असेच काही दाखवले आहे.

स्टायलिश शर्ट, कडं आणि हातात गिटार... पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले रॉकस्टार, कशामुळे झाली ही किमया; वाचा इंटरेस्टिंग न्यूज...
मोदी-ओबामा रॉकस्टार असते तर कसे दिसले असते ?
Image Credit source: instagram
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi))आज जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक बनले आहेत. ते केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. ते कोणत्याही देशात गेले तरी तिथे त्यांचे जल्लोषात स्वागत होते. त्या-त्या देशांत राहणारे भारतीय पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेले दिसतात. ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की नरेंद्र मोदी हे नेते (leader) नसते तर काय झाले असते?

नरेंद्र मोदी हे हातात गिटार धरून स्टेजवर गाणी गात असलेले रॉकस्टार अस , तर ते कसे दिसले असते ? असा विचार करून कदाचित त्यांचे असे रूप पाहण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली असेल. मग, जास्त विचार करू नका, आणि हे फोटो नक्की बघा. सध्या त्यांचा रॉकस्टार अवतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. केवळ पंतप्रधान मोदींचाच नव्हे तर जगातील सर्व बलाढ्य देशांच्या नेत्यांचा रॉकस्टार लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

 

मोदी-पुतिन यांच्यासह जागतिक नेत्यांचे रॉकस्टार अवतार पहा

खरंतर, या नेत्यांची छायाचित्रे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आली आहेत. हे इन्स्टाग्राम, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर jyo_john_mulloor नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये आपण नरेंद्र मोदींपासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांचा रॉकस्टार ‘अवतार’  पाहू शकतो.

या अप्रतिम फोटोंना आतापर्यंत 31 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून यूजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण म्हणतात की, ‘मोदीजींना वर पाहून छान वाटलं’, तर काही म्हणतात की ‘सगळीच चित्रे एकाहून सरस आहेत’.

त्याचप्रमाणे आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘ ओबामा माझे आवडते आहेत. ते खूप नैसर्गिक दिसत आहेत आणि हा रॉकस्टार लूक त्यांना शोभतही आहे.’ ‘शी जिनपिंग कुठे आहेत? ते जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक आहेत’ असा सवालही एका युजरने केलाआहे. तर काही वापरकर्ते असेही म्हणत आहेत की ही महान सर्जनशीलता आहे.

हल्ली AI ने तयार केलेले अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रभू श्रीरामांचा एक सुंदर फोटो शेअर करण्यात आला होता, तोही खूप गाजला होता.