मुंबई : जगातील सर्वात लांब नखे असलेल्या महिलेने अखेर 30 वर्षांनंतर आपली नखं कापली आहेत. हो चक्क 30 वर्षांनंतर अमेरिकेतील ह्युस्टनच्या अयाना विल्यम्सनं आपली नखं कापली आहेत. 2017 मध्ये अयानाने हाताच्या बोटांची नखं वाढवण्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. त्यावेळी तिची नखं 19 फूट लांब होती. सीएएनएनने दिलेल्या वृत्तानुसार आयना विल्यम्सला दोनपेक्षा जास्त नेल पॉलिशच्या बॉटल्स लागतात. एवढंच नाही तर मॅनिक्युअर करण्यासाठी तिला पूर्ण एक तास लागायचा. आता 30 वर्षांनंतर तिने आपली नखं कापण्याचा निर्णय घेतला आहे. (World’s Longest Nails: ‘World’s Longest Nails’, Guinness World Records)
नखं कापण्यासाठी इलेक्ट्रिक रोटरी टूलचा वापर
त्यांची ही लांब नखं कापण्यासाठी इलेक्ट्रिक रोटरी टूल वापरण्यात आली. त्यापूर्वी त्यांच्या नखांची लांबीसुद्धा मोजण्यात आली. तर ज्यावेळी त्यांची नखं कापण्यात आली त्यावेळी नखांची लांबी 24 फूट आणि 0.7 इंच एवढी होती.
‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ ची माहिती
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, 90 च्या दशकाच्या सुरूवातीला पहिल्यांदा वल्ड रेकॉर्ड असलेल्या व्यक्तिने आपली नखं कापली आहेत. अयना विल्यम्ससाठी हा भावनिक क्षण होता.
नखं कापताना काय होत्या भावना
ती म्हणाली,”मी काही दशकांपासून माझे नखं वाढवत आहे, म्हणूनच मी एका नवीन जीवनासाठी तयार आहे.”
नखं वाढवण्यासाठी 28 वर्षांचा कालावधी
आयना विल्यम्सने तिची नखं वाढण्यात 28 वर्षे लावली. लांब नखांमुळे, तिला दररोजची कामं करण्यात अडचणींचा सामना करावा लागला. तिचे नखं लांब असल्यामुळे भांडी धुणे किंवा बेडशीट बदलणे यासारखे काम तिच्यासाठी कठीण झाले होते.
संबंधित बातम्या
आम्हीही फ्रंटलाईन वर्कर्स, कोरोना लस आधी द्या, वेश्या व्यवसायातील महिलांची मागणी