World’s Most Expensive French Fries: जगातील सर्वांत महागडे फ्रेंच फ्राईज; या फ्रेंच फ्राईजवर चक्‍क सोने भुरभुरलेले असते

| Updated on: Jul 13, 2022 | 11:19 PM

हे जगातील सर्वात महागडे फ्रेंच फ्राईज आहेत. याची किंमत 200 डॉलर्स म्हणजेच सुमारे 15 हजार रुपये इतकी आहे. या फ्रेंच फ्राईजवर चक्‍क सोने भुरभुरलेले असते. या फ्रेंच फ्राईजची नोंद गिनिज बुकमध्येही करण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या ‘सेरेनडिप्टी 3’ या रेस्टॉरंटमध्ये हे गोल्डन फ्रेंच फ्राईज मिळतात. शेफ जो आणि शेफ फ्रेड्रिक यांनी हे जगातील सर्वांत महागडे फ्रेंच फ्राईज बनवले आहेत.

Worlds Most Expensive French Fries: जगातील सर्वांत महागडे फ्रेंच फ्राईज; या फ्रेंच फ्राईजवर चक्‍क सोने भुरभुरलेले असते
Follow us on

न्यूयॉर्क : फास्ट फूड आवडीने खाणाऱ्यांच्या यादीत फ्रेंच फ्राईज हा पदार्थ नेहमीच टॉपवर असतो. लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच फ्रेंच फ्राईज आवडतात. यामुळे कोणतीही पार्टी असो स्पेशल ओकेजन याचा मेन्यू फ्रेंच फ्राईज शिवाय पूर्ण होतच नाही. या फ्रेंच फ्राईजची किंमत 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत असते. मात्र, अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमध्ये याची किंमत जवळपास 15 हजार रुपये इतकी आहे. यात इतंक काय खास आही की ते इतके महागडे(World’s Most Expensive French Fries) आहेत. असा प्रश्न पडतो.  या फ्रेंच फ्राईजवर चक्‍क सोने भुरभुरलेले असते. यामुळेच याची किंमत एवढी महाग आहे. ‘क्रीम डी ला क्रीम पोम फ्राईटस्’(Creme de la Creme Pom Fries’) या नावाने फ्रेंच फ्राईजची वेगळी डिश सर्व्ह केली जाते.

बटाट्याचे उभे काप तेलात तळून त्यावर मीठ मसाला भुरभुरुन हे ‘फ्रेंच फ्राईज’ किंवा ‘फिंगर चिप्स’तयार केले जातात. अमेरिकेतील एका रेस्टॉरंटने या पदार्थाला आणखी खास बनवले आहे. न्यूयॉर्कच्या या रेस्टॉरंटने ‘क्रीम डी ला क्रीम पोम फ्राईटस्’(Creme de la Creme Pom Fries’) या नावाने फ्रेंच फ्राईजची वेगळी डिश तयार केली आहे. या डिशची खासीयत म्हणजे यावर चक्‍क सोने भुरभुरलेले जाते.

जगातील सर्वात महागडे फ्रेंच फ्राईज

हे जगातील सर्वात महागडे फ्रेंच फ्राईज आहेत. याची किंमत 200 डॉलर्स म्हणजेच सुमारे 15 हजार रुपये इतकी आहे. या फ्रेंच फ्राईजवर चक्‍क सोने भुरभुरलेले असते. या फ्रेंच फ्राईजची नोंद गिनिज बुकमध्येही करण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या ‘सेरेनडिप्टी 3’ या रेस्टॉरंटमध्ये हे गोल्डन फ्रेंच फ्राईज मिळतात. शेफ जो आणि शेफ फ्रेड्रिक यांनी हे जगातील सर्वांत महागडे फ्रेंच फ्राईज बनवले आहेत.

आणखी काय खास आहे या फ्रेंच फ्राईजमध्ये

हे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी उच्च दर्जाच्या बटाट्यांचा वापर केला जातो. ‘विंटेज 2006’ ची शँपेन, जे ली ब्लँक फ्रेंच शँपेन व्हिनेगार, ट्रफल सॉल्ट, ट्रफल ऑईल, विशेष प्रकारचे चीज, बटर तसेच 23 कॅरेट एडिबल गोल्डचे डस्टिंग यामध्ये वापरले जाते. ऑर्गेनिक जर्सी गायींच्या दूधापासून मिळणारे क्रीम यामध्ये वापरले जाते. इतकी महागडी सामग्री वापरून हे फ्रेंच फ्राईज तयार केले जातात. ते खास मोर्ने सॉसबरोबर सर्व्ह केले जाते. विशेष म्हणजे ज्या डिशमधून हे फ्रेंच फ्राईज ग्राहकांना खायला दिले जाते ती डिश देखील सामान्य नाही. बॅकरेट क्रिस्टल अरबीस्क प्लेटवरच हे फ्रेंच फ्राईज दिले जातात.