नवी दिल्ली | 3 ऑगस्ट 2023 : ते अत्यंत कलाकुसरीने काम करीत असतात. त्यांना एका डोळ्याने दिसत नव्हते तरी त्यांनी तीन दिवस मेहनत करीत जगातील सर्वात लहान 24 कॅरेट सोन्याची बॅग तयार केली आहे. यापूर्वी जगातीस सर्वात सुक्ष्म बॅग तयार करण्याचा रेकॉर्ड अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या नावावर होता. आता उदयपूरच्या डॉ. इकबाल सक्का या कारागिराने ही 0.02 इंच लांबीची बॅग तयार केली आहे. या साखरेच्या दाण्याहून कमी आकाराच्या या बॅगेचे नाव तिरंगा बॅग ठेवण्यात आले आहे.
डॉ. इकबाल सक्का यांनी म्हटले की या हॅंडबॅगला 24 कॅरेट सोन्यापासून बनविली आहे. या सोन्याच्या बॅगला तीन दिवसात बनविण्यात आली आहे. या कामादरम्यान त्याने एका डोळ्याने दिसायला बंद झाले. तरीही त्यांनी एका डोळ्याने काम पूर्ण केले. ऑपरेशननंतर त्यांना त्या डोळ्याने दिसू लागले आहे. एकाच जागी टक लावून पाहील्याने त्यांच्या डोळ्याला त्रास झाला असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सक्का यांनी सुक्ष्म हॅंडबॅगला तिरंगा नाव दिले आहे. त्याला तिरंगी रंगही दिला आहे. या बॅगेचा लिलाव करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहीले आहे. या सुक्ष्म हॅंडबॅगला सोन्याच्या वजन काट्यावर ठेवले तर त्याचे कोणतेही वजन दाखविले गेले नाही. यापूर्वी सक्का यांना अशा अजबगजब वस्तू तयार करण्यासाठी अनेक पूरस्कार मिळणार आहेत. उदयपूरचे नाव त्यांनी अजरामर केले आहे.