यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील वर्धा नदीच्या घाटावर अवाढव्य असा मासा आढळला. या माशाचे वजन तब्बल 28 किलो असून खिरट जातीचा हा मासा आहे. या माशाला पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांची झूंबड ऊडाली आहे. तसेच चवीसाठी उत्तम असल्यामुळे हा मासा खरेदी करण्यासाठीसुद्धा खवय्यांनीसुद्धा चांगलीच गर्दी केली होती. (Yavatmal big fish found people gathered to purchase it see video)
मिळालेल्या माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे वर्धा नदीच्या घाटावर एक मच्छिमार मासेमारी करण्यासाठी गेला होता. यावेळी जाळे जड लागल्यामुळे आपल्या जाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे अडकल्याचे मच्छीमाराला वाटले. आज आपल्या हाती मोठा ऐवज लागल्याचा आनंद या मच्छिमाराला झाला. मात्र, जाळं पूर्णपणे बाहेर काढल्यानंतर जाळ्यात तब्बल 28 किलोचा एकच मसा अडकल्याने तो अवाक झाला. त्यानंतर चवीसाठी अतिशय उत्तम असलेला हा मासा खिरट जातीचा असल्याचे या मच्छिमारास समजले.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, हा एवढा मोठा मासा हाती लागल्यामुळे त्याला बघण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. तसेच खिरट जातीचा मासा सापडल्यामुळे पट्टीच्या खवय्यापर्यंत ही माहिती काही क्षणांत पोहोचली होती. त्यानंतर या माशाला खरेदी करण्यासाठी खवय्यांनी मोठी गर्दी केली होती. एवढी सारी गर्दी जमल्यामुले मच्छिमाराने या माशाची विक्री घरूनच केली.
RBI चे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल आता बिस्किट बनवणाऱ्या कंपनीची जबाबदारी सांभाळणार#britannia #urjitpatel #biscuitmanufacturingcompany #britanniacompanyhttps://t.co/eptHZ4k1KB
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2021
इतर बातम्या :
VIDEO | झूम… झूम… झूम……झूम; दारुड्याच्या करामती एकदा पाहाच
April Fools Day 2021 : केवळ ‘फूल’ डे नाही तर या खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे ‘1 एप्रिल’
Video | समुद्रात जाऊन तरुणांची मस्ती, मुंबई पोलिसांनी थेट कोंबडा होऊन पळायला लावलं, व्हिडीओ व्हायरल
(Yavatmal big fish found people gathered to purchase it see video)