Zomato च्या खवय्याने फेव्हरेट डीशवर ताव मारण्यासाठी वर्षभरात खर्च केले 5 लाख रुपये, वर्षभरात सर्वाधिक मागणी या डीशला

| Updated on: Dec 29, 2024 | 10:45 PM

ऑनलाईन फूड डिलिव्हरी करण्याचे चलन वाढले आहे. झोमॅटोद्वारे फूड डिलिव्हरीची साल 2024 ची आकडेवारी जाहीर झाली आहे. झोमॅटोवरुन आवडत्या रेस्टॉरंटमधून फेव्हरेट डीश ऑर्डर करण्याची सोय आहे.

Zomato च्या खवय्याने फेव्हरेट डीशवर ताव मारण्यासाठी वर्षभरात खर्च केले 5 लाख रुपये, वर्षभरात सर्वाधिक मागणी या डीशला
Follow us on

स्मार्टफोनमुळे घरबसल्या आवडत्या डीश ऑर्डर करणे आता सामान्य गोष्ट झाली आहे.परंतू कोणता ग्राहक एकाच रेस्टॉरंटच्या एकाच डिशसाठी वर्षभरात 5 लाख खर्च करेल हे सांगून तु्म्हाला खरे वाटेल का ? परंतू हे घडले आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी App झोमॅटोच्या साल 2024 च्या अहवालात लोकांच्या खानापानाच्या सवयीची मजेशीर आकडेवारी समोर आली आहे. साल 2024 मध्येही बिर्याणी ही भारताची सर्वात आवडती डीश सिद्ध झाली आहे. यंदा 9 कोटींहून अधिक बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली. म्हणजे सरासरी दर सेकंदाला तीनपेक्षा जास्त बिर्याणीची ऑर्डर डिलिव्हर झाली आहे.

अनोखा खवय्या

बंगलुरुच्या एका अनामिक फूड लव्हरने एका रेस्टॉरंटमधून एकच डीश ऑर्डर करून वर्षभरात 5 लाखाहून अधिक बिल चुकविले आहे. या ऑर्डरला Zomato ने आतापर्यंतचे सर्वात मोठे सिंगल बिल असे म्हटले आहे.

बिर्याणी भारताचे सर्वाधिक पसंतीची डीश

साल 2024 मध्ये बिर्याणी हा भारताची सर्वाधिक आवडती डीश असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या वर्षी नऊ कोटीहून अधिक लोकांनी ऑनलाईन बिर्याणी ऑर्डर केली आहे.म्हणजे सरासरी दर सेकंदाला तीनहून अधिक बिर्याणीची ऑर्डर डिलिव्हरी झाल्या आहेत. बिर्याणीच्या नंतर भारतात पिझ्झा सर्वाधिक ऑर्डर केलेली डीश ठरली आहे.Zomato च्या एपद्वारे या 2024 वर्षात 5.84 कोटी पिझ्झा डिलिव्हर झाले आहेत. ही आकडेवारी पाहाता ऑनलाइन फूड डिलिव्हरी एपने इंडियन डीशची मागणी वाढत असली तर फास्ट फूडची क्रेज काही कमी झालेली नाही हे पिझ्झाच्या वाढत्या मागणी वरुन स्पष्ट झालेले आहे.

हे सुद्धा वाचा

राजधानी दिल्लीत सर्वाधिक ऑर्डर

दिल्लीच्या कस्टमरनी या वर्षी Zomato च्या सर्व्हीस सर्वाधिक लाभ उठविला आहे. दिल्लीवासियांनी जेवणाच्या खर्चात 195 कोटीची बचत केली आहे. आणि सर्वाधिक टेबल आरक्षित केले.दिल्लीनंतर बंगळुरु आणि मुंबई अनु्क्रम दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. साल 2024 मध्ये झोमॅटोच्या माध्यमातून ग्राहकांनी 1.25 कोटीहून अधिक टेबल्स बुक केली आहे, यात सर्वाधिक टेबल्स बुक Father’s Day च्या दिवशी झाली आहेत. फादर्स डेला 84,866 जणांनी आपल्या वडीलांसोबत लंच वा डिनर केला आहे.