नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : मोदी सरकारच्या वतीने (Modi Government) देशभरातील कोट्यवधी नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालविल्या जातात. यामधील काही योजना ग्रामीण भागातील जनतेला मोठा लाभ मिळवून देतात. उज्ज्वला योजना असो वा जनधन सारख्या सरकारी योजना, या योजना ग्रामीण भागातील जनतेसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. गोरगरिब वर्गातील जनतेला, मध्यमवर्गीय कुटुंबाला या योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत आहे. सध्या सोशल मीडियावर एका मॅसेज व्हायरल होत आहे. यामध्ये मोदी सरकारने रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card Holder) जोरदार योजना सुरु केल्याचा दावा करण्यात येत आहे. या योजनेमुळे रेशन कार्डधारकांना घबाड हाती येणार आहे. मोदी सरकार 2 स्मार्टफोनसह 10,200 रुपये देणार असल्याचा मॅसेज व्हायरल होत आहे. काय आहे या व्हायरल मॅसेजची (Viral Massage) सत्यता.
काय आहे फ्री स्मार्टफोन योजना
सध्या सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये मोदी सरकारच्या नवीन योजनेविषयी दावा करण्यात आला. फ्री स्मार्टफोन योजना, असे तिचे नाव आहे. या योजनेतंर्गत केंद्र सरकार रेशन कार्डधारकांना मोफत स्मार्टफोनचे वाटप करणार आहे.
काय आहे प्रकरण
व्हायरल पोस्टमध्ये योजनेची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, मोदी सरकारने गरीब आणि मध्यमवर्गासाठी खास योजना आणली आहे. या योजनेतंर्गत रेशन कार्डधारक कुटुंबातील दोघांना एक एक स्मार्टफोन देण्यात येणार आहे. तसेच त्यांना 10,200 रुपये पण देण्यात येणार आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
#YouTube चैनल Sarkari Vlog के वीडियो में दावा किया गया है कि ‘फ्री स्मार्टफोन योजना 2023’ के तहत केंद्र सरकार प्रत्येक परिवार के 2 सदस्यों को स्मार्टफोन लेने के लिए उनके खाते में ₹10,200 दे रही है#PIBFactCheck
▶️यह दावा फर्जी है
▶️ केंद्र सरकार ऐसी कोई योजना नहीं चला रही है pic.twitter.com/vbdVU1XY7U
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 13, 2023
मॅसेजची सत्यता काय
या व्हायरल मॅसेजची लागलीच पडताळणी करण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीने त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले. इंटरनेटवर सध्या व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हा मॅसेज खोटा असल्याचे समोर आले. मोदी सरकार अशी कोणती ही योजना चालवत नसल्याचे. असा कोणताही प्रस्ताव नसल्याचा दावा करण्यात आला.
युट्यूब चॅनलचा खोडसाळपणा
पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागाने या मॅसेजची पडताळणी केली. एका युट्यूब चॅनलने हा खोडसाळपणा केल्याचे समोर आले. सरकारी ब्लॉग या नावाच्या या युट्यूब चॅनलने हा दावा केला होता. त्यानुसार, मोदी सरकार रेशन कार्डधारकांना दोन स्मार्टफोन आणि 10,200 रुपये देईल. हा व्हायरल मॅसेज खोटा असल्याचे समोर आले आहे.