5G Spectrum Auction : भारतात चीन आणि पाकिस्तान पेक्षाही महाग असणार 5G सेवा? स्पेक्ट्रमचे दर कमी करण्याची मागणी

| Updated on: Apr 19, 2022 | 2:06 PM

भारतात इंटरनेटचे 5G तंत्रज्ञान (5G Mobile Services) आणण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. प्रमुख मोबाईल ऑपरेटर कंपन्यांकडून 5G तंत्रज्ञानाच्या टेस्टिंगला देखील सुरुवात झाली आहे. तर काही कंपन्यांनी चाचणी देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. मात्र आता सर्व प्रक्रिया ही स्पेक्ट्रमवर होणाऱ्या खर्चावर येऊन ठेपली आहे.

5G Spectrum Auction : भारतात चीन आणि पाकिस्तान पेक्षाही महाग असणार 5G सेवा? स्पेक्ट्रमचे दर कमी करण्याची मागणी
Follow us on

भारतात इंटरनेटचे 5G तंत्रज्ञान (5G Mobile Services) आणण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. प्रमुख मोबाईल ऑपरेटर कंपन्यांकडून 5G तंत्रज्ञानाच्या टेस्टिंगला देखील सुरुवात झाली आहे. तर काही कंपन्यांनी चाचणी देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न 5G तंत्रज्ञानाच्या खर्चाचा आहे. 5G साठी कंपन्यांकडे अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी करण्यात आली आहे. मात्र एवढे पैसे देण्यास कंपन्या अद्याप तयार नसल्यामुळे स्पेक्ट्रमचा (5G Airwaves Auction) लिलाव देखील लांबवण्यात आला आहे. लिलाव लांबल्यामुळे आता सरकारने देखील 5G लीलावाची किंमत 36 टक्क्यांनी कमी करण्याची तयारी दाखवली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने देखील किंमत 36 टक्क्यांनी कमी करण्यात यावी असा प्रस्ताव सरकारसोमोर मांडला आहे. आता हे पहाणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे की, ट्रायचा प्रस्ताव सरकार स्विकारणार का, स्विकारल्यास लवकरच भारामध्ये 5G सेवा लॉंच होऊ शकते.

दर स्वस्त करण्याची मागणी

सरकारने 5G स्पेक्ट्रम लिलावाच्या बोलीत चाळीस टक्के कपात करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र तरी देखील एकही कंपनी यामध्ये रस दाखवण्यास तयार नाही. सरकार जरी 5G तंत्रज्ञानाची किंमत चाळीस टक्क्यांनी कमी करण्यास तयार असले तरी देखील ही किंमत खूप जास्त असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. सरकारने 5G स्पेक्ट्रम लीलावाचे दर चाळीस नव्हे तर 90 टक्क्यांनी कमी करावेत. तरच सर्वसामान्य माणसांना 5G सेवा परवडू शकेल असे कंपन्यांचे म्हणणे आहे. कंपन्यांनी युक्तीवादात असे म्हटले आहे की, सरकारने स्पेक्ट्रम लिलावामध्ये जरी चाळीस टक्के सूट दिली तरी देखील भारतातील 5G स्पेक्ट्रम सेवा ही इतर देशांच्या तुलनेत चीन, जर्मान, ब्राझिल, एवढेच नव्हे तर पाकिस्तानपेक्षाही महाग असणार आहे. मग एवढी महाग सेवा देशातील सर्वसामान्य माणूस खरेदी करू शकणार का? असा सवाल कंपन्यांनी उपस्थित केला आहे.

भारतात 5G सेवा कधी लाँच होणार?

भारतातमध्ये 5G सेवा कधी लाँच होणार याबाबत वेगवेगळे रिपोर्टचे वेगवेगळी मते आहेत. समजा जर 5G स्पेक्ट्रमचा लिलाव वेळेत झाला तर चालू वर्षाच्या डिसेंबरपर्यंत भारतातील नागरिकांना 5G सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. 5G सेवा ही एक गतिमान इंटरनेट सेवा असून, यामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक बदल घडू शकतात. तसेच माहितीचे अदान-प्रदान देखील अधिक गतिमान होऊ शकते.

संबंधित बातम्या

Air India : टाटा ग्रुपने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे नशीब पालटले, पंधरा दिवसांत दोन मोठ्या गिफ्टची घोषणा

Today Gold Silver Price: आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात तेजी, चांदी सत्तर हजारांवर, चेक करा तोळ्या तोळ्याचा भाव

RBI report: जागतिक घडामोडींचा प्रतिकूल परिणाम, मात्र भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत – आरबीआय