नवी दिल्लीः सरकारी कर्मचाऱ्यांना आता आणखी एक आनंदाची बातमी असणार आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए वाढ) वर्षातून दोन वेळा वाढवला जातो. डीए किती वाढेल, हे एआयसीपीआय निर्देशांकावर अवलंबून आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देश सध्या महागाईच्या समस्येला तोंड देत आहेत. देशातील महागाईबाबत आरबीआयने आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळेच आरबीआय यावेळेस नोव्हेंबरमध्ये आर्थिक धोरण वेळेच्या अगोदर जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण महागाईच्या दिवसातच आता महागाई भत्ता भरघोस वाढणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, महागाई भत्त्यात (डीए वाढ) 4 टक्क्यांनी जाहीर वाढ करण्यात आली आहे. 1 जुलै 2022 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
डीए मध्ये पुढील सुधारणा जानेवारी 2023 पासून होणार आहेत. महागाईची स्थिती पाहता येत्या काही दिवसांमध्ये महागाई भत्त्यात पुन्हा 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जानेवारीत महागाई भत्ता 42 टक्क्यांपर्यंत वाढण्याचीही शक्यता आहे.
महागाई भत्त्याचा नियम असा आहे की तो 50 टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्यावर येईल. 2016 मध्ये जेव्हा 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला तेव्हा महागाई भत्ता शून्य करण्यात आला होता.
कर्मचाऱ्यांना भत्ता म्हणून मिळणारी रक्कम मूळ वेतनात 50 टक्क् दराने जोडली गेली होती. उदाहरणार्थ, जर मूळ वेतन 18,000 रुपये असेल, तर त्याला 9,000 रुपयांच्या 50 टक्के DA मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांना मिळणारा पूर्ण डीए मूळ वेतनात जोडला जावा, असा नियम असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. पण असे करताना अनेक वेळा आर्थिक परिस्थिती आड येते.
तथापि, हे 2016 मध्ये केले होते 2006 मध्ये सहावी वेतनश्रेणी लागू झाली तेव्हाही पाचव्या वेतनश्रेणीत डिसेंबरपर्यंत 187 टक्के डीए मिळत होता त्यावेळी संपूर्ण डीए मूळ वेतनात विलीन करण्यात आला होता.