नवी दिल्ली : म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) पद्धतशीर गुंतवणूक योजनेच्या ( SIP) माध्यमातून बचत योजनेपेक्षा अधिकचा परतावा मिळतो. अनेक योजनांमधील परताव्याचे गणित चक्रावून टाकणारे आहे. चक्रवाढ व्याजाचा चमत्कार गुंतवणूकदारांना मालामाल करतो. कोटक म्युच्युअल फंडचा डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडने (Diversified Equity Fund) असा चमत्कार घडवला आहे. कोटक फ्लेक्सी कॅप सबफंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीवर जोरदार परतावा मिळाला आहे. या इक्विटी म्युच्युअल फंडात 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीने तीन आकडी परतावा दिला आहे. 13 वर्षांच्या कालावधीत या म्युच्युअल फंड योजनेत 15.90 लाख रुपयांची गुंतवणूक 46 लाख रुपये झाली आहे.
कोटक फ्लेक्सीकॅप फंडला देशातील सर्वात मोठा ओपन-एंडेड इक्विटी फंड मानण्यात येते. सप्टेंबर 2009 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. या एमएफ योजनेने Eurozone संकट, Quantitative आर्थिक तणाव, नोटबंदी आणि कोविड यासारख्या संकटातही या फंडने जोरदार परतावा दिला आहे.
दीर्घ कालीन आधारावर या फंडने जोरदार प्रदर्शन केले आहे. फंडचा मार्केट कॅप सर्वच श्रेणीत जोरदार प्रदर्शन केले आहे. त्यामुळे या फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे.
कोटक म्युच्युअल फंडातील आकडेवारीनुसार, 2009 मध्ये हा फंड सुरु झाला तेव्हा त्यात एक लाखांची एकरक्कमी गुंतवणूक आता 5.6 लाख रुपये झाली असती. परंतु, एसआयपीद्वारे ही रक्कम गुंतवली असती तर, जोरदार परतावा मिळाला असता.
कोटक फ्लेक्सीकॅप फंडाच्या सुरुवातीला 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीमध्ये गुंतवणूक केली असती तर आज त्याचे मूल्य 45.84 लाख रुपये झाले असते. 1 लाख रुपयांची एकरक्कमी गुंतवणुकीचा CAGR 13.9% आहे. तर 10,000 रुपयांच्या मासिक SIP मध्ये CAGR 14.8% आहे.
एसआयपी म्युच्युअल फंडद्वारे एक सुव्यवस्थित गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंडात रोज, आठवडाभरात, मासिक, वार्षिक आधारावर एक निश्चित रक्कम गुंतविता येते. त्याआधारे योजनेवर चांगला परतावा मिळतो.
डाटानुसार, सप्टेंबर 2009 मध्ये दर महिन्याला 10,000 रुपयांची SIP सुरु केली असती तर नोव्हेंबर 2022 पर्यंत एकूण गुंतवणूक 15.90 लाख रुपये झाली असती. सध्या या गुंतवणूकीचे मूल्य 45 लाख 84 हजार 655 रुपये झाले असते. सुरुवात झाल्यापासून या फंडने आतापर्यंत 14.84% परतावा दिला आहे.
हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराने याविषयीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गुंतवणूक सल्लागार, तज्ज्ञाचा सल्ला घेणे ही फायद्याचे ठरु शकते.