मुंबई : जसजशी अक्षय तृतीया जवळ येत आहे, तसतशी सोन्या-चांदीच्या भावात (Today Gold- Silver Price) घसरण पहायला मिळत आहे. अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा सोने (Gold) स्वस्त झाल्याने अक्षय तृतीयेला मोठ्याप्रमाणात सोन्याच्या खरेदीचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या काही आठवड्यापासून सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने सोन्यामधील गुंतवणुकीसाठी हा काळ सर्वाधिक योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आज शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. शुक्रवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48 हजार रुपये इतके होते. आज सोन्याच्या दरात किंचत वाढ झाली असून, 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 48550 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणेजच आज सोन्यामध्ये प्रति तोळा 550 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 52 हजार 970 रुपये इतके आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. चांदीचे दर शुक्रवारच्या तुलनेत आज किलोमागे 500 रुपयांनी घसरले असून, आजचा चांदीचा (Silver) दर 63500 रुपये इतका झाला आहे. सोन्याचे दर हे सोनं अधिक दागिन्यांच्या घडणावळीचा दर असा ठरवला जात असल्याने अनेक ठिकाणी त्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात तफावत आढळून येते.