आधार अपडेट मोफत करायचं आहे? थोडेच दिवस शिल्लक, करा घाई

| Updated on: Nov 26, 2023 | 1:51 PM

आधारकार्ड आपल्या भारतीयाची राष्ट्रीय ओळख बनले आहे. सरकारी योजनाच्या लाभार्थ्यांपासून ते इतर सरकारी आणि खाजगी कामासाठी सर्वत्र आधारकार्ड विचारले जाते. जर तुमचे आधारकार्ड काढून दहा वर्षे झाली असतीत आणि तुम्हाला त्यात काही बदल करायचा असले तर तो बदल मोफत करण्यासाठी खूपच कमी दिवस शिल्लक आहेत. तेव्हा त्वरा करा...

आधार अपडेट मोफत करायचं आहे? थोडेच दिवस शिल्लक, करा घाई
aadhar card update
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : आधारकार्ड आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे. या कार्डाशिवाय कोणतेच सरकारी किंवा खाजगी काम होणे अशक्य आहे. जर आधारकार्डामध्ये काही जूनी माहीती अपडेट केली नसेल तर तुमचे काम रखडू शकते. जर आधारकार्डला नवीन माहितीप्रमाणे अपडेट केले नाही तर फ्रॉर्ड सुद्धा होऊ शकतो. यामुळे सरकारने दहा वर्षे जुन्या आधारकार्डला अपडेट करण्यासाठी सांगितले होते. UIDAI ने आधारकार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. जर तुमचे आधारकार्ड दहा वर्षे जुने आहे. तर तुम्हाला घाई करायला हवी.

आधारकार्ड फ्रीमध्ये केव्हापर्यंत अपडेट होणार ?

केंद्र सरकारने 10 वर्षे जुने आधारकार्ड अपडेट करण्यासाठी परिपत्रक काढले होते. जर तुम्हाला दहा वर्षे जुने आधारकार्ड अपडेट करायचे असेल तर UIDAI च्या वेबसाईट किंवा आधारकार्ड सेंटरवर जाऊन करावे लागेल. यासाठी आपल्याकडून कोणताही चार्ज घेतला जाणार नाही. मोफत आधारकार्ड अपडेट करण्याची डेडलाईन 14 डिसेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे.

आधारकार्डला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अपडेट करता येते. काही कामे ऑनलाईन पद्धतीने होत नाहीत त्यासाठी तुम्हाला नजिकच्या आधारकार्ड केंद्रावर जावे लागेल. आधारकार्ड किंवा CSE केंद्रात तुम्हाला जावे लागेल. तेथे ऑनलाईन अपॉईंटमेंट तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला रांगा लावण्याची गरज राहणार नाही. UIDAI ची अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण आधार कार्ड अपडेटसाठी अपॉइंटमेंट घेऊ शकता.

UIDAI आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती करण्यासाठी चार्ज भरावा लागतो. परंतू 14 डिसेंबर 2023 पर्यंत या गोष्टी अपडेट करण्यासाठी कोणताही चार्ज नाही.

चला पाहूया आधी कोणत्या दुरुस्तीसाठी चार्ज भरावा लागायचा…

– 5 वर्षे, 15 वर्षे आणि 17 वर्षांपेक्षा जास्त कोणत्याही व्यक्तीच्या आधारमध्ये बायोमॅट्रीक अपडेट करण्यासाठी 100 रुपयाचा चार्ज आहे.

– डेमोग्राफीक डाटासाठी 50 रुपयाचा चार्ज वसुल केला जातो

– बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी 100 रुपये शुल्क

– डेमोग्राफिक डेटा ऑनलाइन अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क

– आधार डाऊनलोड आणि कलर प्रिंटवर 30 रुपये शुल्क

– ओळख आणि पत्ता बदल अपडेट करण्यासाठी 25 रु.शुल्क

– पिन आधारित पत्ता अपडेट करण्यासाठी 50 रु. शुल्क