नवी दिल्ली | 19 नोव्हेंबर 2023 : आधार हा एक 12 अंकी खास ओळख क्रमांक आहे. देशात आधार कार्डचा अनके ठिकाणी उपयोग होतो. पॅन कार्डशी आधार जोडणी करणे गरजेचे आहे. बँक खाते, पोस्टातील खाते, डिमॅट खाते वा इतर अनेक कामासाठी आजही आधारची गरज आहे. त्याशिवाय पुढील प्रक्रिया पूर्ण होत नाही. e kyc केले नसेल तर तुमची अनेक कामे पूर्ण होऊ शकत नाही. आता तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. शेतकऱ्यांना विविध योजनेचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते. त्यासाठी बँक खाते आधारशी जोडणे आवश्यक आहे. नाहीतर या सर्व प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. जोडणी केली नाही तर काहीच मदत मिळणार नाही.
असे तपासा स्टेट्स
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे अधिकृत पोर्टल ‘myAadhaar’ जाऊन तुम्हाला कोणते बँक खाते थेट आधारशी लिंक आहे हे कळते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक खाते असतील तर ते आधार खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे की नाही हे तपासायचे असेल तर ही आहे सोपी प्रक्रिया…
बँकेशी आधार कार्ड जोडले की नाही?
1. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर https://uidai.gov.in/ क्लिक करा
2. My Aadhaar वर क्लिक करा. ड्रॉप डाऊन मेन्यूवर जा आणि आधार सेवा निवडा
3. Aadhaar Services चे सेक्शन निवडा. या ठिकाणी आधार आणि बँक खाते यांची जोडणी झाली की नाही हे तपासा
4. पुढील पानावर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक मिळेल.
5. पुढे ओटीपी पाठवावर क्लिक करा आणि रजिस्टर मोबाईल क्रमांकावरील ओटीपी आता नोंदवा
6. ओटीपी टाकल्याने तुमचे कोणत्या कोणत्या बँकेशी आधारकार्ड लिंक केले आहे ते समोर येईल.
SMS वर चेक करा स्टेट्स
आयकर विभागाने एसएमएसच्या माध्यमातून पॅन-आधारकार्ड लिकिंग स्टेट्स चेक करण्याचा पर्याय दिला आहे. त्यासाठी करदात्यांना 567678 अथवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवणे आवश्यक आहे. जर दोन्ही कार्ड जोडण्यात आले असतील, तर त्याची माहिती तुम्हाला मिळेल.
बँक खाते लिंक नसल्यास
तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन सुद्धा आधार लिंक केले आहे की नाही हे तपासू शकता. लिंक नसल्यास अगोदर याविषयीचा अर्ज भरा आणि बँकेत दाखल करा. यासोबत आधार आणि पॅन याची पण एकत्रित माहिती जोडा. केवायसी झाल्यानंतर काही मिनिटातच आधार-पॅन लिंक होईल. जर असे केले नाही तर बँकेतील खात्यात व्यवहार करता येणार नाही.