नवी दिल्ली : आधार कार्ड नियामक, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नवीन सुविधा सुरु केली आहे. भारतीय नागरिकांना आता आणखी एक टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. इंटरॲक्टिव्ह व्हाईस रिस्पॉन्स (IVRS) या तंत्रज्ञानाच्या आधारावर घरबसल्या तुम्हाला तुमच्या आधार कार्डची माहिती मिळेल. ही सेवा 24 तास सुरु राहील. ग्राहक त्याच्या आधार कार्डची माहिती, जसे की, नोंदणी (Enrollment), स्टेटस अपडेट (Update Status) , PVC कार्ड याविषयीची माहिती या टोल फ्री क्रमांकावरुन मिळवू शकतात. आधार कार्डचे स्टेटस जाणून घेण्यासाठी एसएमएस करु शकता. तसेच आता टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करु शकता.
या नवीन सेवेची माहिती युआयडीएआयने ट्विटच्या माध्यमातून दिली. आयव्हीआरएसच्या मदतीने ही सेवा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. नागरिकांना त्यांच्या आधार कार्डचा क्रमांक, त्याची सध्यस्थिती, पीव्हीसी कार्डची स्थिती अपडेट करु शकतात. त्याविषयीची माहिती एसएमएसद्वारे मिळवू शकता. तसेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) टोल-फ्री नंबर 1947 वर 24×7 असा कॉल करु शकता.
इंटरॲक्टिव्ह व्हाईस रिस्पॉन्स (IVRS) ही तंत्रज्ञान आधारीत 24 सेवा आहे. कम्युटरद्वारे ही सेवा टेलिफोन सिस्टिमच्या आधारे नागरिकांना बोलण्याचे स्वातंत्र्य देते. ग्राहक, वापरकर्त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात येतो. तसेच एक्झिक्युटीव्ह कडे कॉल हस्तांतरीत करण्यात येतो. त्यामुळे वापरकर्त्याला त्याच्या आधारकार्डविषयीची अद्ययावत आणि इत्यंभूत माहिती मिळते.
#ResidentFirst
Experience new services built on #IVRS by UIDAI.
Residents can call the UIDAI toll-free number 1947, 24×7 to find out their Aadhaar enrollment or update status, PVC card status or to receive information via SMS.@GoI_MeitY @mygovindia @PIB_India @_DigitalIndia pic.twitter.com/PRs06Qi010— Aadhaar (@UIDAI) February 15, 2023
युआयडीएआयने आधार नोंदणी, अपडेट अशा स्थितीची माहिती. आधार पीव्हीसी कार्डची सध्यस्थिती, नोंदणी केंद्र यासारख्या सुविधांची माहिती, यासंबंधीचा अनुभव समृद्ध करण्यासाठी टोल फ्री क्रमांक सेवा सुरु केली आहे. तसेच AI/ ML आधारीत चॅटबॉट ‘Aadhaar Mitra’ ही सेवाही सुरु करण्यात आली आहे. वापरकर्त्याला यावर तक्रार ही नोंदविता येते. तसेच बॉटचा वापर करुन तक्रार ट्रॅकही करता येते.
आधार कार्डमधील (Aadhaar Card Update) पत्ता अपडेट करण्यासाठी आता घरातील कुटुंब प्रमुखाची (Head of Family) परवानगी घेणे आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठाच्या परवानगीनेच ऑनलाईन पत्ता अपडेट करता येईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) याविषयीचा नियम जाहीर केला आहे. कुटुंब प्रमुखाच्या सहमतीशिवाय यापुढे आधार कार्डमधील पत्ता अपडेट करता येणार नाही. पत्ता अपडेट करण्यासाठी अर्जदारांना 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया एका महिन्याच्या आत पूर्ण होऊन आधारवरील पत्त्यात बदल होईल.