What’s your age : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर अनेकदा फॉर्म भरताना तुम्हाला तुमचे सध्याचे वय (age) भरण्यास सांगितलं जातं. अशा वेळेसे आपण वय कॅलक्युलेट (age calculation) करून लिहीतो, ते सोपं आहे. पण किती वर्ष, महिने आणि दिवस पूर्ण झाले, असं कोणी विचारलं तर ते मोजणं थोडं किचकट होऊ शकतं की. अशा वेळेस आपण वही-पेन घेऊ, बरंच डोक लढवून संपूर्ण वय ( वर्ष, महिने, दिवस) मोजू लागतो. पण असं असलं तरी प्रत्येकालाच वय Calculate करायला जमतच असं नाही.
पण सध्याचं युग हे टेक्नॉलॉजीचं आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलच्या फास्ट जमान्यात एखादी गोष्ट चुटकीसरशी होऊ शकते. मग वय मोजणं तरी कठीण का राहील ? या साधनांचा योग्य वापर केला तर तुम्ही चुटकीसरशी तुमचं ( संपूर्ण) वय मोजून सांगू शकता. फक्त त्यासाठी त्याची योग्य पद्धत माहीत असली की झालं.
चला मग जाणून घेऊया वय मोजण्याचा उपाय (How to Calculate Age)
Mobile App द्वारे असं मोजा तुमचं वय
Excel Sheet द्वारेही मोजता येईल वय
जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वय शोधायचे असेल तर प्रत्येकाचे वय स्वतंत्रपणे ऑनलाइन शोधणे खूप मोठं आणि जिकीरीचं काम होतं. पण तुम्ही हे काम स्प्रेडशीट किंवा एक्सेल शीटद्वारे अगदी सहजपणे करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येकाची जन्मतारीख लिहावी लागेल आणि त्यानंतर फॉर्म्युला सेट करावा लागेल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे वय काही मिनिटांत शोधू शकाल. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ऑनलाइन फॉर्म्युला शोधू शकता.