Amazon Prime Subscription : OTT लवर्सची दिवाळी, आता फक्त 67 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राईमचं सब्सक्रिप्शन, वापरा ही सोपी ट्रीक

| Updated on: Nov 09, 2024 | 7:14 PM

OTT लव्हर्ससाठी Amazon Prime Video वर नव्या नव्या वेब सीरीज आणि चित्रपट रिलीज होत आहेत. त्यामुळे तुम्ही जर अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Amazon Prime Subscription : OTT लवर्सची दिवाळी, आता फक्त 67 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राईमचं सब्सक्रिप्शन, वापरा ही सोपी ट्रीक
Follow us on

OTT लव्हर्ससाठी Amazon Prime Video वर नव्या नव्या वेब सीरीज आणि चित्रपट रिलीज होत आहेत. त्यामुळे तुम्ही जर अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सर्वात कमी किमतीमध्ये तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन कसं घेऊ शकता? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनेकांना वाटतं की अमेझॉन प्राईमच वार्षिक सब्सक्रिप्शन हे खूप महाग आहे, मात्र असं नाहीये.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फक्त 67 रुपयांच्या प्रती महिना खर्चात तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन कसं खरेदी करू शकता? तुम्हाला त्यासाठी फक्त दर महिन्याला 67 रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्याबदल्यात तुम्हाला अ‍ॅमेझॉन प्राईमवर आलेल्या सर्व लेटेस्ट वेबसीरीज आणि चित्रपटांचा आनंद मिळणार आहे. Amazon Prime Subscription चा वार्षिक प्लॅन तुम्ही खरेदी करायला गेलात तर त्यासाठी तुम्हाला 1499 रुपये मोजावे लागतात. मात्र कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी एक स्वस्त प्लॅन देखील लाँच केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला वर्षाला केवळ 799 रुपयेच मोजावे लागणार आहेत. याचाच अर्थ तुम्हाला महिन्याला फक्त 66.58 रुपये खर्च करून नवनव्या चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.

अ‍ॅमेझॉनच्या ऑफिशयल साईटवरील माहितीनुसार जर तुम्ही अ‍ॅमेझॉनची अ‍ॅमेझॉन प्राईम लाईट मेंबरशिप खरेदी करणार असाल तर तुम्हाला प्रति महिना केवळ 66.58 एवढेच पैसे भरावे लागणार आहेत. तर अ‍ॅमेझॉन प्राईम लाईटचं वार्षीक सब्सक्रिप्शन अवघ्या 799 रुपयांमध्ये मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला 1499 रुपये मोजण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला या सब्सक्रिप्शनमध्ये या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज झालेल्या प्रत्येक नव्या वेबसीरीज आणि चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. तसेच वस्तूंची फ्री आणि फास्टेस डिलिव्हरी देखील मिळणार आहे.