नवी दिल्ली : जेव्हा पण तुम्ही पैसा जमा कराल तेव्हा तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुमचा पैसा किती दिवसात डबल (Money Double) होईल. त्यात किती दिवसांनी वाढ होईल. प्रत्येक जण गुंतवणुकीपूर्वी (Investment) त्याचा पैसा किती दिवसात डबल होईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. अर्थात प्रत्येक योजना काही ठरल्याप्रमाणे तुमचा पैसा लागलीच दामदुप्पट करत नाही. काही योजनांमध्ये (Investment Scheme) रक्कम जमा केल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर रक्कम दुप्पट होते. पण काही योजनांमध्ये कमी कालावधीतही तुम्हाला मालामाल होता येते. पण काही सोप्या नियमांद्वारे तुम्हाला रक्कम दुप्पट कशी आणि कधी होते, हे कळते.
जीवन विमा आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate-NSC) अशी ही योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. कमीत कमी रुपयात गुंतवणूक सुरु करता येते. एक हजार रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनांमध्ये बचतीसोबतच ग्राहकांना चक्रव्याढ व्याजाचा (Compound Interest) मोठा लाभ मिळतो. विशेष म्हणजे या बचत योजनांना सरकारचे अभय आहे. त्यामुळे अल्पबचत योजनांमधील गुंतवणूक ही संपूर्णता सुरक्षित असते.
या योजनेत तुम्हाला जोखीममुक्त गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुमचा पैसा एकदम सुरक्षित राहतो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत (National Savings Certificate) गुंतवणूक फायद्याची ठरते. या योजनेत पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो.
त्यासाठी तुम्ही हे साधे नियम लक्षात ठेवा. या सोप्या नियमांआधारे तुम्हाला किती दिवसांत तुमची रक्कम दुप्पट होऊ शकते अथवा त्यापेक्षा अधिकचा परतावा मिळू शकतो, हे कळते. किती वर्षात रक्कम दुप्पट अथवा तिप्पट होईल हे काही साध्या फॉर्म्युलाने लक्षात येईल.
किती वर्षांत रक्कम दुप्पट होईल यासाठी नियम 72 आहे. तज्ज्ञ आणि विश्लेषक व्यवहारात याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. नियम 72 द्वारे तुम्ही हे माहिती करुन घेऊ शकता की, तुमची गुंतवणूक किती दिवसात, किती वेळेत दुप्पट होईल.
समजा तुम्ही एखाद्या वित्तीय संस्था, बँकेच्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक केली असेल. या योजनेवर सध्या वार्षिक 7 टक्के व्याज मिळत असेल. तर नियम 72 नुसार, या 72 ला 7 ने भागावे लागेल. 72/7= 10.28 वर्षे, म्हणजे या योजनेत तुमचे पैसे 10.28 वर्षांत दुप्पट होईल.
नियम 114 हा पण एक नियम आहे. या योजनेनुसार तुमचा पैसा किती वर्षात तिप्पट होतो, हे कळते. त्यासाठी तुम्हाला 114 ला व्याजदराने भागावे लागते. एखाद्या गुंतवणूक योजनेत तुम्ही रक्कम गुंतवली. या योजनेवर वार्षिक 8 टक्के व्याज दर मिळत असेल, तर 114 ला 8 ने भाग द्याव लागेल. 114/8= 14.25 वर्षात तुम्हाला तिप्पट रक्कम मिळेल.
नियम 144 नुसार तुमची गुंतवणूक किती दिवसात चारपट होईल ते समजते. वार्षिक 8 टक्के व्याज दराने तुम्हाला किती वर्षात चार पट परतावा मिळेल हे स्पष्ट होते. 144/8= 18 वर्षात ग्राहकांना चारपट परतावा मिळेल.